पिंपरी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे यशस्वी आयोजन;..

पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वकिलांचा उत्स्फूर्त सहभाग..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २२ मार्च २०२५ पुणे जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, पिंपरी न्यायालय व पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पिंपरी न्यायालयात “राष्ट्रीय लोक अदालतीचे” आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमासाठी पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश मे. एन. आर. गजभिये साहेब, मे. श्रीमती टी. एस. महाडिक साहेब, मे. एस. एन. गवळी साहेब त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्रमुख न्यायाधीश गजभिये साहेब व अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पक्षकार, वकील व बालाजी लॉ कॉलेजचे नवोदित वकील होऊ पाहणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



