इतिहास अर्नाळा किल्ल्याचा ..

प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुलुंड मूंबई दि. २२ मार्च, २०२५ विरार: रोटरॅक्ट क्लब ऑफ विरार यांनी अर्नाळा किल्ल्यावर वारसा फेरीचे आयोजन केले. इतिहास अभ्यासक, श्री. निनाद पाटील ह्यांनी या उपक्रमाचे मार्गदर्शन केले. या फेरीत सहभागींना अर्नाळा किल्ल्याच्या ऐतिहासिक महत्त्वाची सखोल माहिती देण्यात आली. किल्ल्याची वास्तुशास्त्र, मराठ्यांचा इतिहास आणि त्याचा संरक्षणातील महत्त्व याविषयी श्री. निनाद पाटील यांनी मार्गदर्शन केले.
रोटरॅक्ट क्लबच्या या उपक्रमामुळे युवा पिढीला आपल्या ऐतिहासिक वारशाची ओळख होण्यास मदत झाली. सहभागी सदस्यांनी किल्ल्याच्या भक्कम तटबंदीपासून ते त्याच्या भौगोलिक वैशिष्ट्यांपर्यंत सर्व काही अनुभवले. वारसा फेरी मध्ये रोटरॅक्ट क्लब ऑफ विरार चे अध्यक्षजी Rtr. तेजस, Rtr. निहाल, Rtr. साहिल, Rtr. प्रणित, Rtr. खुश, Rtr. कनिष्का ह्यांनी आपली उपस्थिती दर्शविली. त्यांच्या सोबतच Rtr. यासिर, Rtr. शिवम, Rtr. आयुष, Rtr. प्रथम, Rtr. यामिनी, Rtr. तान्या, Rtr. दिनेश व इतर सहकारी होते.
ही फेरी केवळ वारसा संवर्धनाच्या गरजेवर प्रकाश टाकणारी ठरली नाही, तर उपस्थितांमध्ये अभिमानाची भावना देखील निर्माण झाली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ विरारच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या ऐतिहासिक फेरीमुळे स्थानिक इतिहासाविषयी जागरूकता वाढली आणि सर्व सहभागींसाठी ही प्रेरणादायी सफर ठरली.



