लता मंगेशकर वैद्यकीय प्रतिष्ठानची मान्यता रद्द करण्यात यावी.

या रुग्णालयावर शासकीय सेवेतील अधिकारी प्रशासक नेमण्यात यावा.
रुग्णालयाची सर्व खाती तात्काळ जप्त करून शासनाने ताब्यात घ्यावे.
रुग्णालय प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा – लोकसेवक युवराज दाखले
प्रतिनीधी पुणे दि. ०४ एप्रिल २०२५ पुणे शहरात वास्तव्यास असलेल्या तनिषा सुशांत भिसे या प्रसूती वेदनेने तळमळत असताना अवाजवी अनामत रकमेचा भरणा करण्याच्या अविचल धोरणानुसार वैद्यकीय सुविधा नाकारल्या. त्यातून आईचा व मातृत्वाचा करुण अंत झाला. मध्यमवर्गीय व मागासवर्गीय यांनी आमच्या रुग्णालयात येऊन घाण निर्माण करू नये हा धडा समाज व्यवस्थेला शिकवण्यासाठी जाणिवपूर्वक केलेला केलेली ही हत्याच आहे.
स्थावर व जंगम मालमत्ता गोळा करून काही ठराविक लोकांना मागच्या दाराने आर्थिक लाभ देण्यासाठी अशा प्रकारचे रुग्णालय चालवले जातात हे त्यापैकीच एक.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व संशोधन केंद्र हे २००१ पासून कार्यरत आहे. सध्या ८०० अंतररुग्न सेवा असलेले धर्मदाय रुग्णालय असल्याचा येथे बोर्ड ही लावलेला आहे. मंगेशकर कुटुंबीयां द्वारे स्थापन केलेल्या, लता मंगेशकर वैद्यकीय प्रतिष्ठान व आप्पा पेंडसे यांनी स्थापन केलेल्या ज्ञान प्रबोधिनीच्या सहकाऱ्यांनी हे रुग्णालय चालवले जाते.
सामाजिक आणि वंचित रुग्णांना वैद्यकीय दृष्ट्या मदत करण्याकरिता बजाज फायनान्स लिमिटेड, फिनोलेक्स केबल लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, ऋषी शिपिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व आणखी अशाच ३७ मोठ्या उद्योगांद्वारे या रुग्णालयाला आर्थिक सहकार्य केले जाते.
तसेच रोटरी क्लब ऑफ पुणेचे धर्मदाय कार्यालय यांचे सोबत इतर १७८ मोठ्या व्यक्ती या रुग्णालयाला आर्थिक सहकार्य करत आहेत. ही संस्था एफसीआरए ॲक्ट १९७४ अन्वये नोंदणीकृत असून बॉम्बे सार्वजनिक ट्रस्ट ॲक्ट १९५० अंतर्गत नोंदणी असल्याने परदेशी संस्थांकडून कोट्यावधी रुपये धर्मदाय रुग्णसेवेच्या करिता इतर कोणत्याही शासकीय रुग्णालयाला मिळणाऱ्या अनुदानांपेक्षा कित्येक पटीने जास्त निधी स्वीकारत आहे.
रुग्णालयाने रुग्णांचे हक्क व जबाबदारी अंतर्गत जाहीरनामा जाहीर केला आहे. प्रथम क्रमांकावर “Right to access to medical care irrespective of caste, creed, religion, and economic status” असे नमूद केलेले आहे.
१. रुग्णालयाच्या नावात संशोधन हा शब्द वापरून शासनाकडून मोठ्या प्रमाणावर आयकर सूट घेतली जात आहे.
२. धर्मदाय हा शब्द वापरून जमीन, बिल्डिंग व इतर स्थावर व जंगम मालमत्ता गोळा करण्याकरिता शासकीय योजनांचा लाभ घेतला जात आहे.
३. रुग्णालयाच्या क्वालिटी पॉलिसीमध्ये “committed to medico social services” अशा प्रकारचे शब्द वापरून वर्ल्ड बँक सहायीत संस्थांच्या सहकार्याने मालमत्तेत वाढ करण्यात येत आहे.
४. व्हिजन स्टेटमेंट मध्ये लिहिलेले आहे की “Rational ethical medical services to all patients at affordable cost without any discrimination” आधी असे करून National Accreditation Board of Hospital and Healthcare Providers यांचेकडून प्रमाणपत्र मिळवण्यात आले आहे.
५. रुग्णालयाच्या ०४ कोर व्हॅल्यूज पैकी “धर्मदाय” / चॅरीटी मुख्य आहे. परंतु National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories यांचे प्रमाणपत्र मिळवून रुग्णांकडून तपासणी करिता मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारणी केली जात आहे.
६. रुग्णालयाच्या गुणवत्ता धोरणामध्ये असे नमूद केलेले आहे की ” We will not discriminate between rich and poor with regards to medical treatment”
या पार्श्वभूमीवर अशी मागणी करण्यात येते की
१. लता मंगेशकर वैद्यकीय प्रतिष्ठानची सर्व प्रथम मान्यता रद्द करण्यात यावी.
२. या रुग्णालयावर शासकीय सेवेतील अधिकारी प्रशासक नेमण्यात यावा.
३. रुग्णालयाची सर्व खाती तात्काळ जप्त करून शासनाने ताब्यात घ्यावे.
४. प्रतिष्ठान व रुग्णालयाच्या माध्यमातून काही ठराविक लोकांना दिले जाणारे आर्थिक लाभ तात्काळ गोठवावेत.
५. रुग्णालय प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
अन्यथा शिवशाही व्यापारी संघ व सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल या कामी उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा लोकसेवक युवराज दाखले, जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे, शिवशाही व्यापारी संघ खेड तालुका अध्यक्षा उषाताई कांबळे, पुणे शहर अध्यक्षा ललीताताई गायकवाड, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे यांनी निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना भेटून देताना हा इशारा दिला आहे.