महाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिक

दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाची ठाणे महापालिकेला भेट..

प्रतिनिधी सतिश वि.पाटील मूलूंड मुंबई दि. ०९ एप्रिल २०२५ दिवा, कळवा, खारीगाव व मुंब्रा शहरातील नागरी समस्यांबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाची ठाणे महापालिका आयुक्तांसोबत बैठक.
काल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कल्याण जिल्हाप्रमुख दिपेश पुंडलीक म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळाने ठाणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन दिवा, कळवा व मुंब्रा शहरांतील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध मूलभूत नागरी अनेक जाचक व बिल्डिंर लांबीच्या फायद्यासाठी डिपी प्लान यावर आपले मत मांडले.
पाणीपुरवठा, विकास आराखडा आणि पर्यावरण यासारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले. चर्चा झालेल्या मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे होते:
१) दिवा शहरासाठी स्वतंत्र जलपुरवठा योजना
दिवा शहरात सुरळीत व पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्र (WTP) व नवीन जलपुरवठा योजना राबवण्याची मागणी.
२) अनधिकृत डंपिंग व बांधकामांवर कारवाई
दिवा परिसरात वाढलेल्या बेकायदेशीर कचरा डंपिंग व अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची गरज.
३) स्वतंत्र निसारण व्यवस्था (STP) दिवा शहरात स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया केंद्र (STP) उभारण्यासाठी नवीन निसारण वाहिन्यांचे जाळे तयार करण्याची विनंती.
४) कळवा विकास आराखड्यात सुधारणा
नवीन विकास आराखड्यातील अव्यवहार्य व नागरिकांच्या घरांवर प्रभाव टाकणाऱ्या प्रस्तावित रस्त्यांचा फेरविचार करून सल्लागार समिती स्थापनेची सूचना. पुनर्वसनाची योग्य योजना राबवण्याची मागणी.
५) वाहतूक कोंडी व प्रदूषणावरील उपाययोजना
ठाणे व कळवा परिसरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यांची पुनर्रचना, सिग्नल यंत्रणांची सुधारणा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याची गरज अधोरेखित.
६) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील आयसीयू व एनआयसीयू सुविधा अपुरी कळवा येथील महापालिकेच्या रुग्णालयात आयसीयू व एनआयसीयू बेड अपुरे असून, त्या सुविधांची तातडीने वाढ करून नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!