अजंठा नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या गैरकारभारासंबंधीत शिवसेनेचे अमरण उपोषण..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड ०४ सप्टेंबर २०२३ यावेळी उपोषणास बसलेल्यांना त्यांच्या मागण्यांनसंदर्भात चर्चा केली असता त्यांनी सांगीतले की अजंठा नगर येथील एस. आर. ए. पुनर्वसन प्रकल्पात एम.आय.डी.सी.
मधील प्लॉट नंबर जी. पी. ३१ व पत्रा शेड मधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे कामकाज (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे व पिंपरी चिंचवड विभाग, शिवाजीनगर) कार्यालया मार्फत होत असून आमच्या वस्तीतील काही मयत व्यक्तींची नावे बनावट स्वाक्षरी करून महानिबंधक झोपडपट्टी पुनर्वसन पुणे यांच्या कडे नोंदणी प्रस्ताव दाखल करण्यात आला असून मयत नावे यादीत टाकण्यात आल्याने होणारी फसवणूक थांबवावी या मागणी साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (पिंपरी चिंचवड शहर) शहर संघटक युवराज कोकाटे व पंढरीनाथ क्षीरसागर (जेष्ठ नेते आर.पी. आय. कवाडे गट ) यांनी अजंठा नगर येथे विविध मागण्यानं साठी सोमवार (०४ सप्टेंबर) पासून आमरण उपोषण सुरु केले आहे.
गेल्या कित्येक वर्षा पासून या प्रकल्पातील अनेक
नागरिक बेघर असून निपक्षपाती अधिकाऱ्याच्या वतीने सर्वे करण्यात यावा व पुढील मागण्याचा विचार करावा अशी मागणी कोकाटेंच्या वतीने करण्यात आली. एस. आर. ए. अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पात घरांच्या संखे बाबत खुलासा आज पर्यंत गेला गेला नाही तो प्रथमता करावा. इमारतचे किती मजली असतील आणि एका इमारतीत किती घरे असणार आहेत, घराची क्षेत्रफळ किती असेल व संबंधित प्रकल्प किती दिवसात पूर्ण होणार याची माहिती लिखित स्वरूपात द्यावी संबंधित प्रकल्प जो कोणी बिल्डर पूर्ण करणार आहे. यांची माहिती मिळावी, प्रकल्पात घर कोणाला मिळेल याची माहिती, अग्रीमेंट कॉपी व फोटो पास मिळावा या शिवाय आजून जी घरे पाडून प्रकल्प होणार आहेत त्या नागरिकांचे देखील घरे पाडण्या आगोदर अग्रीमेंट करण्यात यावे. प्रकल्प अजंठानगर साठीच मर्यादित आहे का व घरे मोफत मिळणार आहेत का याचा
खुलासा व्हावा, मिळकत धारकांची पुनर्वसन
प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यातील रद्द केलेली घरे
मिळावीत, सांस्कृतिक भवन व बौद्ध विहार व रुग्णालय बांधून मिळावे, अजंठा नगर मधील व्यापाऱ्यांसाठी व्यापारी संकुल बांधावे, या प्रकल्पासाठी अजंठा नगर मधील नागरिकांचे फॉर्म भरून घेण्यात आले परंतु एस. आर. ए.च्या यादीत नावेच आली नाहीत याचाही खुलासा करण्यात यावा अशा मागणी या वेळी करण्यात
आल्या आहेत. या प्रसंगी जयराम लांडगे, शहादेव
औसरमल, सुरेश सरक, लव कोकाटे, प्रमिला बनसॊडे, गणेश दहातोंडे, कुश कोकाटे कैलास ससाणे, रावसाहेब सरवदे, भिवाजी वाळके, दत्तात्रय सावंत, संतोष कोळी, रवी नागदे, भाऊ जाधव आदी उपोषणास पाठिंबा दर्शवण्यासाठी उपस्थित होते.



