अपघातमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पिंपरी विठ्ठल नगर पुनर्वसन प्रकल्प येथे भीषण आग २५ गाड्या खाक जिवीतहानी टळली..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २४ डिसेंबर २०२३ पिंपरी नेहरूनगर, विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्प बिल्डींग नंबर ०५ बालाजी हाऊसिंग सोसायटी, या ठिकाणी रात्री ०१ च्या सुमारास पार्किंग मध्ये भीषण आग लागली होती, आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही, या आगीमुळे वाहनांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, साधारणता २५ वाहने जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे व शेजारीच असलेल्या काही घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, ही आग लागताच प्रथमदर्शी नागरिकांनी मा. नगरसेवक राहुल भोसले यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली, मा. नगरसेवक राहुल भाऊंनी लागलीच बातमी कळताच अग्निशामक विभागाशी संपर्क साधून अग्निशामक गाडी घटनास्थळी पाठवण्यास सांगितले आगीमुळे बिल्डिंग मधील दोन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही रात्री अग्निशामकच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्यामुळे मोठी दुर्घटना टळली या अग्निशामकच्या गाडीस येण्यास रस्त्यामधील उभ्या केलेल्या गाड्यांमुळे व टपऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात अडथळा झाला. नागरीकांनी रस्त्यावर उभ्या केलेल्या गाड्यां व टपऱ्या हटवण्याची मागणी स्थानिक मा. नगरसेवक राहुल भोसले यांच्या कडे केली तर मा. नगरसेवक राहुल भोसले यांनी जळालेल्या घरांनची सकाळी येऊन पाहणी करून नागरिकांनची चौकशी केली. व मदतीची ग्वाही दिली.
या घटनेत स्थानिक नागरिक, व सामाजिक कार्यकर्ते यांनी ही आग विझविण्याच्या मदत कार्यात सहकार्य केले व नगरसेवक राहुल भोसले यांनी ही घटना घडताच पिंपरी पोलीस स्टेशनशी संपर्क साधून या घटनेचा सखोल तपास करण्यास सांगितले आहे, विठ्ठल नगर मधील स्थानिक नागरिकांनी मा. नगरसेवक राहुल भोसले यांच्या तत्पर्ते विषयी आभार मानले, या घटनेत ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे मा. नगरसेवक राहुल भोसले यांनी आभार मानले यावेळी ते बोलले की असेच सर्वांनी एकत्र राहून सहकार्याची भूमिका बजवायला हवी यानेच समाज एकसंघ राहिल. यावेळी स्थानिक कार्यकर्ते शिवशंकर उबाळे, राजु कुऱ्हाडे, अशोक बनसोडे, शरद वाघमारे, लखन काकडे, कीशोर गवळी, दत्ता जाधव, नितीन कसबे, आदीं कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!