अभिवादनउत्सवदेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छाशैक्षणिकसामाजिक

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने बोपखेल रामनगर परिसरात भारतीय संविधानाच्या असंख्य प्रतिचे वाटप.

प्रतिनिधी विनोद इसरानी बोपखेल पूणे दि. १४ एप्रिल २०२५ भारतीय संविधान निर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे असलेले योगदान, भारतीय नागरिकांना संविधानाने दिलेले अधिकार व कर्तव्य याबाबतची जनजागृती व जगभरातील राज्य घटनांचा अभ्यास व्हावा या उदात्त हेतूने बोपखेल (रामनगर-गणेशनगर) भागात आज ५१ नग “भारतीय संविधान” देवुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
या वेळी जिवन दान ट्रस्ट अध्यक्षा सौ. सुमन सोनवने उपाध्यक्षा निलिमा जाधव, ॐकार सोनवने, अशोक बाराथे, विद्वान गायकवाड, किरण पाटोळे, सविता ताई खरात, मारुती मोरे, दत्तात्रय घुले, विजय सोनवणे, ॐकार बजबळे, रविंद्र वडमारे, अरुण मोरे, संकेत पाटील, विशाल भोसले, रोहिदास जोशी, सचिन कदम इ. उपस्थित होते
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न सत्यात आणायचं असेल तर पहिलं त्यांनी सांगितलेल्या विचारांना समजून घ्यावं लागेल. त्यांचे विचार आत्मसात करावे लागतील. आणि त्यांच्या विचारांवर मार्गक्रमण करावं लागेल. बाबासाहेबांनी दिलेला ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र अंमलात आणावंच लागेल असे भाग्यदेव घुले यावेळी म्हणाले सदरील कार्यक्रमचे आभार संतोष गायकवाड यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!