अभिवादनउत्सवदेश-विदेशमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरशुभेच्छासामाजिक

विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मुलुंड मधे हर्षउल्हासात साजरी!..

प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुलुंड मूंबई दि. १७ एप्रिल २०२५ मुलुंड सहकार विश्व् को.ऑप. सो. लि. सिद्धार्थ स्पोर्ट्स क्लब व धम्मपौर्णिमा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादाप्रमाणे या ही वर्षी महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव मुलुंड सहकार विश्व् सोसायटी या ठिकाणी साजरा करण्यात आला.
सदर जयंती उत्सवाची सुरुवात ३० मार्च २०२५ रोजी MSV प्रीमियर लीग क्रिकेट मॅचेसने करण्यात आली.
दि ०५ एप्रिल २०२५ रोजी सम्राट अशोक जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी सम्राट अशोक यांच्या जीवनावर व्याख्यान घेण्यात आले.
०५ व ०६ एप्रिल २०२५ रोजी पुरुष व महिलांसाठी कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आले होती
दि. ११ एप्रिल २०२५ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती उत्सवानिमित्त महिलांसाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित धम्मपौर्णिमा महिला मंडळ यांच्या वतीने लघु नाट्य सादर करत मानवंदना देण्यात आली.
दि. १२ व १३ एप्रिल २०२५ रोजी विविध क्रीडा स्पर्धा, शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
दि. १३ एप्रिल २०२५ रोजी धम्मदूत बुद्ध विहार येथे रात्री १२.०० वा.भन्ते आकाश बोधी यांच्या उपस्थितीत त्रिशरण पंचशील घेवून बाबासाहेबाना अभिवादन करण्यात आले. या जयंती उत्सवाच्या निमित्त महाबोधी बुद्ध विहर मुक्ती आंदोलनाचा संदेश देणारा देखावा कु. द्रोणा हिरवे यांनी साकारला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सवा निमित्त दि.१४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ठीक १०.०० डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत धम्मपौर्णिमा महिला मंडळ यांच्या वतीने अमोल कांबळे सर (बॉलीवूड कोरीओग्राफर) यांच्या मार्गदर्शनाखाली झांज व लेझीम पथकाद्वारे मानवंदना देण्यात आली. सदर मिरवणूकिचे स्वागत मेहुल येथे स्वामी विवेकानंद चौक या ठिकाणी समिता कांबळे मा नगरसेविका व श्री. विनोद कांबळे यांनी केले. या प्रसंगी स्वामी विवेकानंद चौकात धम्म पौर्णिमा महिला मंडळ यांच्या वतीने झांज व लेझीम पथकाच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली तर मेहुल चौक जयंती उत्सव समितीनेही सदर मिरवणुकीचे स्वागत करत लेझिम व झांज पथकातील महिलांचा सन्मान केला, सदर मिरवणुकीचे नाहूर गाव या ठिकाणी परेश डेकोरेटर्स, लाईट आणि साऊंडचे प्रोपरायटर राजू पाटील व सतीश पाटील यांच्या तर्फे नेहमी प्रमाणे अल्पोपहार देवून स्वागत केले.
साय. ठीक ०७.०० वा. वेशभूषा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या नंतर जयंती उत्सवात घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ करण्यात आला.
दि.१५ एप्रिल २०२५ रोजी साय. ठीक ०७.०० वा. भीम गीतांचा दरबार हा प्रबोधनपर कार्यक्रम सादर करण्यात आला सदर कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांच्या जीवनावर आधारित गीतांच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली कार्यकर्माची सांगता झांज व लेझीम पथकातील महिला व मार्गदर्शक अमोल कांबळे सर यांचा विशेष सत्कार उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आला सदर जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व जेष्ठ कार्यकर्ते दिपक कोकळे – खजिनदार, व श्री. रामचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनानुसार अध्यक्ष – मंगेश अरुळेकर, सचिव – प्रसन्न मोरे,द्रोणा हिरवे, कश्यप कटारे, आर्यन अहिवळे, तन्मय पवार, दीक्षांत बसवंत, तन्वी पाटील, मानसी गाडे, श्रुती पवार व असंख्य कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेवून हा जयंती महोत्सव यशस्वी केला!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!