महाराष्ट्रराजकीयविशेषशहरशुभेच्छासामाजिक

बहुजन भीमसेना पक्षाची बैठक यशस्वीरीत्या संपन्न; पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २९ एप्रिल २०२५ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीम सृष्टी येथे बहुजन भीमसेना पक्षाची महाराष्ट्र राज्यस्तरीय बैठक २७ एप्रिलला सायंकाळी ०४ वाजता अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बहुजन भीमसेना महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष भीमरत्न प्रा. बी. बी. शिंदे होते. या वेळी पक्षाच्या महाराष्ट्र राज्य महासचिव प्रा. दिलीप लोखंडे यांनी अध्यक्षपदासाठीची सूचना मांडली, जी राज्य सरचिटणीस बाबुराव पवार यांनी अनुमोदित केली.
बैठकीच्या प्रारंभी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात हौतात्म्याला आलेल्या २८ निरपराध भारतीयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि अतिरेक्यांच्या या भ्याड कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला.
यानंतर बैठकीत पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यात अध्यक्षपदी विठ्ठल विश्वनाथ लांडगे यांची सर्वानूमते निवड करण्यात आली असून, उपाध्यक्ष म्हणून कवी-गायक गोविंद दत्तु, सचिव म्हणून युवराज अर्जुन मस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सौ. सावित्रीबाई बन्सी शिंदे यांची निवड झाली आहे. उपाध्यक्ष म्हणून शालनताई भीमराव ओव्हाळ, सचिव म्हणून सिमा सुनील गजभिये आणि संघटकपदी शबाना हुसेन शेख यांची निवड करण्यात आली.
या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले व आगामी महापालिका निवडणुकीसाठी तत्काळ तयारी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीस संस्थापक अध्यक्ष मोहन भागवत म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रा. बी. बी. शिंदे व प्रा. दिलीप लोखंडे यांनी वैचारिक मार्गदर्शन केले.
पुणे शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा बेबीताई काटकर, पुणे जिल्हाध्यक्ष कांबळे यांचाही बैठकीस उपस्थितीत सहभाग होता. बैठकीच्या शेवटी सचिव बाबुराव पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!