‘एकनिष्ठतेचे प्रतिक’ आमदार अण्णा बनसोडे एक अद्वितिय व्यक्तीमत्व..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०४ मे २०२५ राजकारणापुरता विचार करायचा झाल्यास गुणवत्ता म्हणजे इतरांशी तुलना करण्याचे एकक अजिबात नाही. किंबहुना अण्णा बनसोडे यांची कामगिरी पाहूनच राजकीय गुणवत्तेची व्याख्या करणे अधिक सोपे होते. अण्णांच्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेतल्यास आपल्या लक्षात येते की अण्णा बनसोडे हे सामन्य कुटुंबातुन आले आहेत, एकनिष्ठता म्हणजे अण्णा. अण्णा म्हणजे धाडस, निर्णयक्षमता, निर्भीडपणा, कार्यक्षमता, कुटुंबवत्सलता, उत्साहीपणा, लोकाभिमूखता, सर्वसमावेशकता, सचोटी, तत्परता,अभ्यासूवृत्ती, दूरदृष्टी योग्य निर्णय क्षमता, दिलखुलासपणा, शिस्तप्रियता, न्यायप्रियता, कर्तृत्व, अभ्यासूवृत्ती, वक्तृत्व, नेतृत्व, आदी अनेकविविध गुणांचा संगम म्हणजे अण्णा होय. कदाचित अण्णांच्या मधील या आश्वासक गुणांचे प्रतिबिंबच त्यांच्या कामातून जणू उमटत असते. म्हणूनच अण्णा नेहमी कामामधील गुणवत्तेबाबत सदैव आग्रही असतात. एखादे काम मग ते छोटे असो वा मोठे, केवळ उरकायचे म्हणून अण्णा असे काम करत नाहीत. त्यांना कामाच्या दर्जेदारपणाबाबत तडजोड केलेली आणि चालढकल केलेली अजिबात आवडत नाही. ते आपल्याला त्यांनी जवळपास ३० वर्षापासून करत असलेल्या कार्यातून जाणवते.
नागरिकांना सर्वोत्कृष्ट देण्यासाठी सदैव धडपड करणारे अण्णा हे खऱ्या अर्थाने राजकारणातल्या आश्वासक गुणवत्तेचे प्रमाण आहेत.
मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही त्यांच्या या या सर्व कामाची पावती म्हणूनच त्यांना (पिंपरी चिंचवड शहराला) विधानसभा उपाध्यक्ष हे पद दिले.
आज ४ मे म्हणजे अण्णांचा वाढदिवस… त्यानिमित्त अण्णांना निरोगी आयुष्यासाठीच्या “मूकनायक न्युज पेपर व अनुवाद आपला न्युजच्या” वतिने अनंत शुभेच्छा !!!



