पाथर्डी तालुक्यातील तिसगांव येथे रस्ते अपघातात शेवगांवच्या अनिस शकील सय्यद या तरुणाचा जागीच मृत्यु..

विशेष प्रतिनिधी अविनाश देशमुख शेवगांव दि. १५ मे २०२५ या बाबत सविस्तर वृत्त असे की साधारण दोन दिवसांपूर्वी दि. १२ मे रोजी सोमवारी सायंकाळी ०४:३० च्या दरम्यान आपल्या दुचाकीवरून खासगी कार्यक्रमासाठी अहिल्यानगरला जात असताना वादळी वारे आणि पाऊस याच्या पाश्वभूमीवर पाथर्डी तालुक्यातील तिसगांव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघातात शेवगांवच्या अनिस शकील सय्यद वय ३२ राहणार नाईकवाडी मोहल्ला या तरुणाचा जागीच मृत्यु झाला त्याच्या मागे पत्नी छोटी मुलगी आई वडील असा परिवार होता. त्याच्या अचानक झालेल्या अपघाती अकाली निधनाने शेवगांव शहरावर शोककळा पसरली आहे.
मृताच्या नातेवाईकांना अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके व त्यांच्या सहकार्यांनी दूसर्या दिवशी दुपारी १३ मे मंगळवार रोजी भेटुन सांत्वन केले. या बाबत पोलीस स्टेशन पाथर्डी अकस्मात मृत्यु मृत्यु रजि नं.- ७०/२०२५ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १९४ प्रमाणे मा. वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी हॉस्पिटल अहिल्यानगर
यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अनिस शकीर सय्यद वय ३२ वर्ष राहणार शेवगाव तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर आकस्मात मृत्यु उपचारा दरम्यान उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी येथे झाला दाखल गुन्ह्याचा तपास अमंलदार- पो.ना. ४३२ सुखदेव धोत्रे पाथर्डी पोलीस स्टेशन हे पोलीस निरीक्षक संतोष आर. मुटकुळे पाथर्डी पो. स्टे. यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.



