उत्सवकलाक्रीडामहाराष्ट्रमूंबईविशेषशहरशुभेच्छासामाजिक

छावा प्रतिष्ठान नवी मुंबई मार्फत मुंबईत “छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार “-२०२४ – २०२५ चे आयोजन..

प्रतिनिधी मूंबई दि. २० मे २०२५ छावा प्रतिष्ठान नवी मुंबई या संस्थे मार्फत मुंबई या ठिकाणी २१ मे रोजी होणाऱ्या महाराष्ट्रभरात नावाजलेला “छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार “-२०२४ – २०२५ या पुरस्काराचे आयोजन भव्य दिव्य अशा स्वरूपात करण्यात आलेले आहे. या पुरस्कारासाठी पुणे – पिंपरी चिंचवड परिसरातील क्रीडा क्षेत्रासाठी सुनील साठे, राजेंद्र कांबळे, विष्णुपंत पाटील, सुधा खोले, सुप्रिया यादव व पुणे शहर येथील श्री. अजय कांबळे तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य म्हणून श्री. काळूराम लांडगे, डॉ. व नगरसेवक विश्वास गजरमल व शेती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सुभाष माकर यांना छत्रपती संभाजी महाराज राष्टीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्ध सिने अभिनेते संभाजी माने व प्रसिद्ध सिनेअभिनेत्री कुमुदिनी अदाटे यांच्या शुभहस्ते हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात अनेक नामांकित नगरसेवक आमदार देखील प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत .या सर्वांची पिंपरी चिंचवड शहरांमधून व पुणे येथुन निवड झाल्याबद्दल सर्व क्षेत्रातून या सर्वांचे अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!