गून्हापोलिसमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरटयांना दिघी पोलीस तपास पथकाकडून अटक करून दाग-दागिने केल जप्त..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २० एप्रिल २०२४ दिघी पोलीस ठाणे येथिल दाखल गु. रजि नं. १७६ / २०२४ भा. द. वि कलम ४५४, ४५७, ३८० मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ यांनी सदर गुन्हयाचे अनुशंगाने दिघी पोलीस ठाणे तपास पथकाचे अधिकारी
सपोनि अंभोरे व पोलीस हवा. ८०१ पोटे, पोलीस हवा. १०२० कांबळे, पोलीस हवा.११६८ जाधव, पोलीस हवा. १५७२ जाधव, पोलीस अंमलदार २८२८ काकडे, पोलीस अमंलदार २०९४ जाधव, मपोशि ३७०० बच्छाव यांना मार्गदर्शन करून सुचना दिल्या त्यानुसार सदर पथकाने तांत्रीक विश्लेषण व सी.सी.टि.व्हि. फुटेजच्या आधारे तसेच गोपनीय माहीतीनुसार व्यवस्थित चौकशी करून एक आरोपी अतुल असले हा पुणे शहर मधील काही पोलीस ठाणेच्या रेकॉर्डवरील असल्याची माहिती काढुन त्याचा पत्ता तसेच मोबाईल नंबर प्राप्त करून तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तसेच गुप्त बातमीदारामार्फत तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी जलदगतीने तपास करून आरोपी अतुल चंद्रकांत अमले, वय २८ वर्षे, रा. सिध्देश्वरनगर, विश्वकर्मा मंदिराजवळ, वारजे माळवाडी, ता. हवेली, जि. पुणे यास ता. १५/०४/२०२४ रोजी पिरगुंट घाट, मुठारोड, पुणे येथून ताब्यात घेवून नंतर त्याचेकडून दुसरे आरोपीचा शोध घेवून त्याचे नांव रोहित दिपक सातपुते, वय २८ वर्षे, रा. शंकरमठ, मिरेकर वस्ती, हडपसर, पुणे असे असून दोन्ही अरोपींना शिताफीने ताब्यात घेवून नमुद गुन्हयामध्ये अटक करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवून आरोपीकडून गुन्हयात चोरी गेलेले दाग-दागिने जप्त करून घरफोडीचे दोन गुन्हे उघड केले आहेत.
तसेच नमुद गुन्हयातील दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत असून त्यातील आरोपी अतुल आमले याचेवर विविध पोलीस ठाणेस वेगवेगळया प्रकारचे ३२ गुन्हे दाखल असून आरोपी रोहित सातपुते याचेवर विविध पोलीस ठाणेस वेगवेगळया प्रकारचे १६ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई मा. श्री विनयकुमार चौबे सो., पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री वसंत परदेशी सो. अप्पर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री डॉ. शिवाजी पवार सो, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०३, पिपरी चिंचवड तसेच मा. श्री सचिन हिरे साो. सहा. पोलीस आयुक्त भोसरी एमआयडीसी विभाग, पिंपरी चिंचवड,
यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री विजय ढमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दिघी पोलीस ठाणे व दिघी पोलीस ठाण्याचे सपोनि अंभोरे व पोलीस हवा. ८०१ पोटे, पोलीस हवा. १०२० कांबळे, पोलीस हवा. ११६८ जाधव, पोलीस हवा. १५७२ जाधव, पोलीस अंमलदार २८२८ काकडे, पोलीस अमलदार २०९४ जाधव, मपोशि ३७०० बच्छाव यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!