लातूर येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी कु. अनुष्का पाटोळे हिची हत्या करून आत्महत्या दाखविल्या प्रकरणी संबंधित शाळा प्रशासन व प्राचार्य यांच्यावर तातडीने कडक कारवाई करा- गणेश कलवले.

प्रतिनीधी पिंपरी-चिंचवड दि. 21 जानेवारी 2026 लातूर जिल्ह्यातील नामांकित व राजकीय वरदहस्त असलेली नवोदय विद्यालयात शिकणारी अनुष्का पाटोळे ही विद्यार्थिनी संशयास्पद परिस्थितीत मृत्युमुखी पडलेली आढळली आहे. सदर मृत्यू प्रकरणात सुरुवातीला आत्महत्या असल्याचे दाखविण्यात आले असले तरी, उपलब्ध माहिती, प्रत्यक्षदर्शींची विधाने व सामाजिक माध्यमांतून समोर आलेले गंभीर आरोप पाहता ही आत्महत्या नसून हत्या करून आत्महत्या केली असल्याचे भासविण्यात आले असल्याचा गंभीर संशय निर्माण झाला आहे.
सदर विद्यार्थिनीवर शाळा प्रशासन व प्राचार्यांकडून मानसिक त्रास, दबाव, अपमानास्पद वागणूक व अन्यायकारक वर्तन करण्यात आल्याचे आरोप होत आहेत. अशा प्रकारच्या अमानवी वर्तनामुळे विद्यार्थिनी मानसिकदृष्ट्या खचली होती. अखेर तिचा बळी गेला, असे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे हे प्रकरण आत्महत्येस प्रवृत्त करणे (बीएनएस कलम 108, भादंवि कलम 306) तसेच इतर गंभीर कलमांतर्गत गुन्हा ठरतो.
विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याची जबाबदारी असलेल्या शैक्षणिक संस्थांकडून अशा प्रकारचा निष्काळजीपणा व अमानुष वागणूक होणे अत्यंत दुर्दैवी असून समाजात संतापाची भावना आहे. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा भविष्यात अशा घटना वाढण्याची भीती आहे.
संबंधित शाळा व्यवस्थापनाकडून अशा प्रकारच्या अमानुष घटना घडल्या आहेत का? याची (एसआयटी) स्थापन करून सखोल चौकशी करावी तोपर्यंत या शाळेचा शैक्षणिक परवाना रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन तहसीलदार पिंपरी चिंचवड यांना देण्यात आले आहे.
या वेळी मा. नगरसेवक बापू घोलप, जेष्ठ नेते संदिपान झोंबाडे, मार्गदर्शक डी पी. खंडाळे, मा. अध्यक्ष संजयजी धुतडमल, अध्यक्ष गणेश कलवले, लोकसेवक युवराज दाखले, आण्णासाहेब कसबे, मंगेश डाखोरे, अनिल तांबे, बालाजी गवारे, आबा मांढरे, उषामाई कांबळे, राजू चव्हाण, सचिन सनमूखराव, चैतन्य वाघमारे, अविनाश गालफाडे हे उपस्थित होते. तसेच यांच्याच स्वाक्षरीचे हे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.



