अभिवादनउत्सवदेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

राजमाता अहिल्यादेवी शूर योद्धा उत्तम प्रशासक प्रजाहित दक्ष राज्यकर्त्या होत्या- प्रकाश जाधव.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांना जयंतीनिमित्त जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने अभिवादन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०१ जून २०२५ पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सती प्रथा नाकारली पतीच्या निधनानंतर त्या सती गेल्या नाहीत सासरे मल्हारराव होळकर यांच्या मार्गदर्शनात त्यांनी उत्तम राज्य कारभार सांभाळला पती सासरे नातू असे जवळचे अनेक कुटुंबीय निधन पावल्यानंतर सुद्धा त्या खचल्या नाहीत खंबीर पणे उभे राहून सैन्यात महिलांची तुकडी बनवली. शत्रूला पुरून उरल्या त्या शूर योद्धा, उत्तम प्रशासक तसेच प्रजेच्या हिताचे रक्षण करणर्‍या राज्य कर्त्या होत्या असे प्रतिपादन मराठा सेवा संघ शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने अहिल्यादेवी यांच्या पूतळ्यास पिंपरी येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्या प्रसंगी प्रकाश जाधव यांनी मार्गदर्शन केले. जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्षा सुलभा यादव जिल्हाध्यक्षा मनिषा हेंबाडे विभागीय अध्यक्षा सुनिता शिंदे यांनी राजमाता अहिल्यादेवी यांना पुष्पहार अर्पण केला. या वेळी जिजाऊ ब्रिगेडच्या माणिक शिंदे, वृषाली साठे, कौशल्या जाधव, मंदा पांढरे, संध्या भालेराव, ऊर्मिला देशमुख, मोनिका भोसले, सुमित पांढरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा सचिव वृषाली साठे यांनी केले तर आभार विभागीय कार्याध्यक्षा माणिक शिंदे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!