आंदोलनमहाराष्ट्रमूंबईविशेषसामाजिक

दुर्गाडी किल्ला कल्याण येथे उद्धव ठाकरे सेना व शिंदे सेना यांच्या वतीने घंटानाद..

प्रतिनिधी सतिश वि.पाटील मुबंई दि. ०९ जून २०२५ कल्याण – ऐतिहासिक किल्ले दुर्गाडी येथील दुर्गाडी मंदिरात बकरी ईदच्या दिवशी मुस्लीम धर्मीयांना नमाजपठण करून दिले जाते. मात्र, हिंदूंना देवीची पूजाअर्चा करण्याचा हक्क नाकारला जातो. मंदिर प्रवेशही नाकारला जात असल्याच्या निषेधार्थ शनिवारी शिंदेसेना आणि उद्धवसेनेच्या वतीने घंटानाद आंदाेलन करण्यात आले.
दुर्गाडीवरील दुर्गाडी देवीच्या मंदिराला लागून मुस्लीम बांधवांची नमाजपठणाची जागा आहे. ईदला मुस्लीम धर्मीय नमाजपठण करतात. नमाजपठणाच्या काळात दुर्गाडीदेवी मंदिरातील घंटा आणि नगारा लाल कपड्याने बांधून ठेवला जातो. मंदिर बंद करून पूजाअर्चा करण्यास मज्जाव केला जातो. याविरोधात शिवसनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी घंटानाद आंदोलन सुरू केले होते. पोलिस प्रशासनाने शिंंदेसेना आणि उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची अलीकडेच एक बैठक घेतली होती. या बैठकीतून काही साध्य झाले नाही.
वेगवेगळा न्याय पोलिसांनी घंटानाद करण्यास प्रथम शिंदेसेनेला वेळ दिली. शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आमदार विश्वनाथ भोईर, आमदार राजेश मोेरे, प्रकाश पाटील, अरविंद मोरे, महेश गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांनी घंटानाद केला.
उद्धवसेनेचे नेते विजय साळवी यांच्या नेतृत्वात घंटानाद आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, साईनाथ तारे आदी सहभागी झाले होते. साळवी म्हणाले की, एका समाजाला न्याय देत असताना दुसऱ्या समाजावर अन्याय केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!