पाणीबानीमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागातील पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती करिता गुरुवार दि. १२ जून २०२५ रोजी बंद राहणार..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ११ जून २०२५ पिंपरी चिंचवड शहराच्या पाणी पुरवठा व्यवस्थेमध्ये खंड पडू नये याकरिता वेळोवेळी पाणीपुरवठा यंत्रणेतील देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील से.क्र. २३ येथील स्थापत्य विषयक तसेच विद्युत विषयक कामे तसेच क्षेत्रीय स्तरावरील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील स्थापत्य विषयक तसेच विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्या दि. १२/०६/२०२५ रोजी निगडी जलशुध्दीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन आहे.
त्या अनुषंगाने गुरुवार दि.१२/०६/२०२५ रोजी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागातील संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद राहील व दुस-या दिवशी शुक्रवार दि. १३/०६/२०२५ रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल. तरी नागरिकांनी मनपाकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाणी वापर करून मनपास सहकार्य करावे, असे मुख्य अभियंता-१ प्रमोद ओंभासे पाणीपुरवठा विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी निवेदनातून सांगीतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!