आंदोलनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संभाजी ब्रिगेड व विविध संघटनांच्या वतीने पिंपरीत चक्का जाम आंदोलन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १४ जून २०२५ महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही ते आश्वासन पूर्ण झालेले नाही. या अन्यायाविरोधात शेतकरी, कष्टकरी, दिव्यांगांचे लढवय्ये नेते मा. माजी आमदार बच्चू भाऊ कडू गेल्या ०६ दिवसांपासून अमरावती येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन आयोजीत करण्यात येत आहे.

याच करिता पिंपरी चिंचवड शहरात देखील संभाजी ब्रिगेड व विविध संघटनांच्या वतीने रविवार, दि. १५ जून २०२५ रोजी दुपारी १२ वाजता स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पिंपरी चौक, पिंपरी चिंचवड, पुणे येथे आयोजित केले आहे.
आयोजकांचे आवाहन:
शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी, सरकारच्या दुर्लक्षाविरोधात, सर्व संवेदनशील नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी या चक्का जाम आंदोलनात सहभागी व्हावे.
आता नाही तर कधीच नाही – शेतकरी वाचवा, महाराष्ट्र वाचवा!
आपण या आंदोलनात अवश्य सहभागी व्हावे अशी विनंती आयोजकांच्यावतिने करण्यात येत आहे नम्र विनं

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!