उत्सवपिंपरी चिंचवड मनपा.महाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छाशैक्षणिकसामाजिक

मनपाच्या बोपखेल शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या पहिलीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून उत्साहात स्वागत करण्यात आले- भाग्यदेव घुले

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १७ जून २०२५ नवीन गणवेश, नवीन दप्तर, नवीन वह्या, नवीन पुस्तके, नवे वर्ष, नवा वर्ग, नवे मित्र-मैत्रिणी, प्रत्येक तासाला नवीन गमती जमती..
या सर्वांचे अनुभूती घेण्यासाठी, पुन्हा सर्व विद्यार्थ्यांच्या मनात आनंदाची भरती….
शाळेचा पहिला दिवसच नाही तर येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा आणि ज्ञानाचा यावा म्हणून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापीका सौ. घुगे मॅडमच्या हस्ते औक्षण करून विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशीच्या शुभेच्छा देण्यात आल्या…
विद्यार्थी व विद्यार्थिनींना पहिल्याच दिवशी शाळेच्या वतीने मोफत पाठ्यपुस्तकांचे ही वाटप करण्यात आले.

पाठ्यपुस्तकां बरोबरच चॉकलेट, बिस्किट व पुष्प देवून त्यांचे त्यावेळी शाळेत स्वागत करण्यात आले…
शाळेच्या पहिल्याच दिवशी हातात नवीन पाठयपुस्तक मिळालेले पाहून मुलं-मुली आनंदीत झाल्या.
त्या वेळी शाळेतील सर्व शिक्षक- पालक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य जेष्ठ नागरिक शिवसेना शाखा प्रमुख संतोश गायकवाड व इत्यादी उपस्थित होते
यावर्षी पाठ्यपुस्तकाच्या रचनेत बदल करून सर्व विषयांचा समावेश असलेले असे एकात्मिक पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे.
यामुळे विद्यार्थ्यांचा दप्तराचे ओझे ही कमी झाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!