उत्सवमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

मंगलमय वातावरणात कामशेत माय रमाई फाउंडेशन कार्यालयात दीपक साळवे-ज्योती सिंग या नव दांपत्याचा अंतर जातीय मंगल परिणय सोहळा संपन्न.

प्रतिनिधी कामशेत मावळ दि. २१ जून २०२५ कामशेत मधील माय रमाई फाऊडेशन ट्रस्ट संपर्क कार्यालयात दीपक साळवे व ज्योती सिंग या नव दांपत्याचा माय रमाई फाऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा बोद्धाचार्य डाॅ. अमर चौरे यांनी बौद्ध धम्म पद्धतीत आदर्श अंतर जातीय मंगल परिणय संपन्न केला. या नव दांपत्याना या सोहळ्याचे अतिथी प्रा. सुदामराव औचरे सर, दै. विशाल संविधानचे सह संपादक अशोकराव कांबळे, प्रसिद्ध बांधकाम विकासक बळीराम वाघमारे यांनी आशीर्वाद दिला. या वेळी माय रमाई फाउंडेशन ट्रस्ट संस्थेच्या माध्यमातून बोद्धाचार्य महाराष्ट्र आयकॉन डाॅ. अमर चौरे यांचे राज्यभरातून तीनशेच्या वर सर्व जातीय वधु वरांचे विवाह जुळवून मंगल परिणय सोहळे संपन्न केले आहेत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील जाती नष्ट होण्यासाठी जास्तीत जास्त अंतर जातीय विवाह सोहळे झाले पाहिजेत ही अपेक्षा व्यक्त करून संदेश दिला. बाबासाहेबांनी दिलेल्या संदशाचे बोद्धाचार्य डाॅ. अमर चौरे आचरण करून माय रमाई फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व जाती धर्माचे वधु वर मेळावे आयोजित करुन अशा पद्धतीत अंतर जातीय विवाह सोहळा संपन्न करीत आहेत. त्यांचा सामाजिक उपक्रम गौरवास्पद आहे असे मत दै. विशाल संविधानचे सह संपादक अशोकराव कांबळे यांनी व्यक्त करुन नव वधु वरांना मंगलमय शुभेच्छा दिल्या .
बोद्धाचार्य डाॅ. अमर चौरै यांचे सर्व जातीय वधु वरांचे मंंगल परिणय जमवुन ते संपन्न करायचे समता वादी आदर्श कार्य आहे. डाॅ. चौरे या माध्यमातून खऱ्या अर्थाने बौद्ध धम्म रुजविण्याचे धम्म प्रचाराचे अभिमानास्पद कार्य करीत आहेत. असे मत प्रा. सुदामराव औचरे सर यांनी व्यक्त केले. दीपक व ज्योती हे नव दांपत्य नावा प्रमाणे प्रकाश मान आहेत. त्यांचे भावी आयुष्य प्रकाशमान होवो असे त्यांनी नव दांपत्याना शुभेच्छा दिल्या. या वेळी बांधकाम विकासक बळीराम वाघमारे यांनी ही नव दांपत्याना शुभेच्छा दिल्या. यावेळी माय रमाई फाऊडेशन ट्रस्ट मावळ तालुका अध्यक्ष पदी रंजना चोपडे यांची निवड करण्यात आली तसेच पुणे जिल्हा युवती अध्यक्ष पदी अंजली सरोदे यांची निवड करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!