आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

यशवंतराव चव्हाण मेमोरीयल हॉस्पिटल मध्ये सुविधांचा अभाव, औषधांचा तूटवडा, रुग्णांची हेळसांड आता रोजचेच झाले आहे..

प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण मेमोरीयल हॉस्पिटल पिंपरी-चिंचवड म.न.पा.चे पहिले महाकाय व सर्व सूविधांयूक्त रुग्णालय आहे. ज्यात पिंपरी-चिंचवड मधील रुग्णालयात दाखल रुग्णांना सुविधा अल्प दरात दिली जात होती. पण जेव्हां पासुन यशवंतराव चव्हाण रुग्णालयात मेडीकल कॉलेज सूरू करण्यात आले तेव्हांपासुन या रुग्णालयाचा दर्जा घसरत गेला आणि आता रुग्णालय करोडो रुपयांचे खर्च करुन देखील येथे नेहमीच सुविधांचा अभाव दिसत आहे.

रुग्णांची हेळसांड होत आहे, रुग्णांना ICU, औषधे, व उपचार वेळेवर मिळत नाही, शस्त्रक्रियेच्या आधी सर्व सर्जरीचे साहित्य रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांलया बाहेरील (मेडिकल शाॅप) मधून विकत आणायला लावले जाते. तसेच डायबेटीस, बीपी, हार्ट पेशंटला गोळ्या औषदे मिळत नाही. बाहेरुन घ्यायला लावले जाते. गरिब रुग्णांना महागडी औषधे बाहेरुन घेणे कसे शक्य आहे. याच करीता अल्पसंख्यांक विकास महासंघ, राष्ट्रवादी काॅंग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वेलफेअर पाटी ऑफ इंडिया व इतर पक्षांचे वतीने केस पेपर व इतर सुविधांचे वाढलेल्या दराबाबत आंदोलन करण्यात आले होते. परंतु त्यानंतर ही भरमसाठ दरवाढ केली गेली. आणि दरवाढीनंतरही सुविधांचा अभाव असल्याने, यशवंतराव चव्हाण रुग्णालयास मेडीकल कॉलेजचे माध्यमातून व इतर माध्यमातून भरमसाठ पैसे मिळत असताना रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी. करोडो रुपयांची औषधे खरेदी व दवाखाना उपयोगाचे वस्तु खरेदी करत असताना गरिब रुग्णांनान बाबतीतच हा दूजाभाव का होतोय ?
तरी याबाबत सबंधित अधिकारी व प्रशासनांने जातीने लक्ष घाला. अन्यथा पांढरा हत्ती पोसायचे बंद करा याबाबत आम्ही सह्यांची मोहिम राबवुन निदर्शने केली आहेत. असे रफिक कुरेशी यांनी सांगीतले या वेळी रफीक कुरेशी, डॉ. राजेश नागोसे, सालारभाई शेख, मोहसिन शाह, शाम कसबे व असंख्य कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!