क्रीडामहाराष्ट्रमूंबईविशेषशैक्षणिकसामाजिक

Yai ऑलइंडीया विंड सर्फीग अँड काईट बोर्डिंग गोवा फरारी कु. प्रियांशी पाटील

प्रतिनिधी सतिश वि.पाटील मुंबई दि. २९ जून २०२५ उरण परिसरातील रोटरी इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज उरण बोरी येथे इयत्ता आठवी या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी कुमारी प्रियांशी मयूर पाटील राहणार केगाव – दांडा हिने अवघ्या चार महिन्यांच्या सरावाने विंडसर्फिंग व काईट बोर्डिंग या समुद्रातील खेळात पाच पदके पटकावून नाव कोरले आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत २६ मार्च ते ३० मार्च २०२५ या कालावधीत याचिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांनी आयोजित केलेल्या YAI ऑल इंडिया विंडसर्फिंग अँड काईट बोर्डिंग चॅम्पियनशिप मोर्जिम गोवा यामध्ये कांस्य पदक, १३ एप्रिल ते १७ एप्रिल २०२५ या कालावधीत इंडियन नेवल सेलिंग असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या चॅम्पियनशिप मध्ये रौप्य पदक, २३ एप्रिल ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत गोवा याचिंग असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या सेल गोवा टेक्नो २९३ OD अंडर १५ गर्ल्स या स्पर्धेत कांस्य पदक, ०३ मे ते १० मे २०२५ या कालावधीत याचिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांनी आयोजित केलेल्या YAI युथ नॅशनल रँकिंग इव्हेंट्स या स्पर्धेत कांस्य पदक, २० जून ते २५ जून २०२५ या कालावधीत रॉयल मैसूर सेलिंग क्लब यांनी आयोजित केलेल्या YAI युथ अँड ज्युनियर मल्टी क्लास चॅम्पियनशिप २०२५ या स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!