महाराष्ट्रविशेषशैक्षणिकसामाजिक
हेरिटेज मलकिसदेक फौंडेशन संचलित वसतिगृह बांधकामाचे भूमीपूजनाचा कार्यक्रम संपन्न..

प्रतिनिधी कोल्हापूर दि. २९ जून २०२५ साधारण दोन दिवसांपूर्वी म्हणजे दि. २५ जून रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे या ठिकाणी हेरिटेज मलकिसदेक फौंडेशन संचलित स्वर्गीय वाय. एल. समुद्रे गुरूजी वसतिगृहाचे नियोजित वास्तूच्या बांधकामाचे भूमिपूजन अर्थात कुदळ मारणेचा कार्यक्रम प्रार्थनिय वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्री. राजन नायर यांनी गरजू व गरीब मुलांना शिक्षण घेता येईल व अनेक मुलांचे भविष्य उजळेल असे मत व्यक्त केले व हेरिटेज मलकिसदेक फौंडेशनचे देखील त्यांच्या सामाजिक दृष्टीने गरजू मुलांसाठी केलेल्या विचाराबद्दल कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या वेळी श्री. संजय जगताप, श्री. आशिष उरणकर, श्री. विकास समुद्रे व समाजातील अनेक लोक उपस्थित होते.



