महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी-चिंचवड शहरचे चक्का जाम आंदोलन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०८ जूलै २०२५ निगडीकडून आकुर्डीकडे जाणाऱ्या जुना मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे वरील पुलाशेजारील रस्त्यांवर झालेले खड्डे व भक्ती शक्ती ते निगडी या रस्त्यावरील श्रीकृष्ण मंदिर जवळील मेट्रोच्या कामामुळे झालेले खड्डे यासंबंधित निगडी सिग्नल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी-चिंचवड शहरचे गुरुवार दिनांक १० जूलै २०२५ रोजी चक्काजाम आंदोलन होणार आहे.
या संदर्भात निगडी पोलिस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात लिहिल्याप्रमाणे निगडी सिग्नल ते आकुर्डी खंडोबा माळ या पट्ट्यात सध्या मेट्रोचे काम सूरू आहे. त्यामुळे शेजारील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. सदरील खड्डे अतिशय घातक असून आतापर्यंत बरेच नागरिकांचे तेथे अपघात घडलेले आहेत. एवढी गंभीर परिस्थीती असून देखील मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करून, निवेदन देऊन कोणत्याही प्रकारची कार्यवाही आज पर्यंत करण्यात आलेली नाही.
तसेच भक्ती शक्ती ते निगडी जाणारा मार्ग येथील श्रीकृष्ण मंदिरासमोरील रस्त्यावर मागील १ वर्षापासून खड्डे खोदून ठेवलेले आहेत व तेथे जाण्याचा मार्ग बंद करून ठेवण्यात आलेला आहे. अनेकवेळा मेट्रो अधिकाऱ्यांना निवेदन देऊन देखील सदरील काम अजून पर्यंत करण्यात आलेले नाही.
तरी सदरील वरील दोन्ही विषयांसाठी दिनांक १० जूलै २०२५ (गुरुवार) रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे निगडी सिग्नल येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. असे मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी यावेळी सांगीतले.
यावेळी सचिन चिखले, राजु सावळे, जय सकट, रोहीत काळभोर, आकाश कांबळे उपस्थित होते.



