आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

जिजामाता रुग्णालयातील ड्रेसकोड उल्लंघनावरून बीव्हीजी संस्थेचा ठेका रद्द करण्याची मागणी-सायली नढे

पिंपरी, दि. ०८ जूलै २०२५ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयात बीव्हीजी संस्थेद्वारे पुरविल्या जाणाऱ्या वॉर्ड बॉय आणि इतर कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोड उल्लंघनामुळे रुग्ण आणि नातेवाइकांमध्ये गोंधळ निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सायली नढे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून बीव्हीजी संस्थेचा ठेका रद्द करून ड्रेसकोडचे काटेकोर पालन करणारी नवीन संस्था नियुक्त करण्याची मागणी केली आहे.
सायली नढे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, बीव्हीजी संस्थेच्या कर्मचाऱ्यांसाठी निश्चित केलेला ड्रेसकोड पाळला जात नाही. यामुळे रुग्णालयातील प्रशासकीय कामकाज आणि रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होत आहे. याशिवाय, अनेक कर्मचारी दुपारी जेवणासाठी घरी जात असल्याने, बाहेर जाताना एखाद्या कर्मचाऱ्याला काही झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. “जिजामाता रुग्णालयातील रुग्णसेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. बीव्हीजी संस्थेचा ठेका रद्द करून नवीन आणि जबाबदार संस्थेची नियुक्ती करावी,” अशी मागणी नढे यांनी केली आहे. त्यांनी आयुक्तांना या प्रकरणी त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
या मागणीमुळे रुग्णालयातील सेवेच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, महापालिका प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!