स्मार्ट सिटी बनवता-बनवता झाली बकाल सिटी काळेवाडीत खड्यात रस्ता की रस्तात खड्डे हेच कळेना ?

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १३ जूलै २०२५ काळेवाडी पवनानगर कॉलनी क्रमांक एक या ठीकाणी फूटपाथ दिसेना सर्वत्र फक्त पाणीच पाणी पाण्याचा निचरा होण्या साठी व्यवस्था न केल्याने जागोजागी खड्डे पडले असल्याचे दिसत आहे यातून मार्ग काढत चालताना शाळरी मूले पडताहेत अनेकदा तक्रारी करून पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याचे स्थानीक सांगतात. यावर कधी उपाय शोधनार हे निद्रस्थ पालिका अधीकारी हे पहावे लागेल. स्थानिक म्हणतात की घर पट्टी वसूली करतात पण सूविधा देताना रडतात आमच्या टॅक्सच्या पैशाचे पालिका नक्की करते काय ? जर लवकरात लवकर यावर उपाय शोधला नाही तर स्थानिक एकत्र येवून मोठे जन आंदोलन उभारनार आहेत याची पालिकेनी दखल घ्यावी. मागे ७ ते ८ महिन्यापूर्वी कोबा केला होता त्याची अवस्था अशी झाली की सर्वत्र खड्डे पडलेत त्यात पाणी साठले आहे. एखाद्या झोपडपट्टी पेक्षा ही वाईट अवस्था ही काळेवाडी पवनानगर कॉलनी क्रमांक ०१ या ठीकाणाची झाली आहे. यामूळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे पालिका टॅक्स तर जमा करते पण सुविधा अपु-या देते, पिण्याचे पाणी अनेक वर्षापासून एक दिवसाआड २ तासच भेटते तेही कमी दाबाने देतात. पथ दिवे नादुरूस्त आहेत त्या कडे कोणाचे लक्ष नाही परिसर व घरात साप निघतात. तक्रारी करून ही प्रभाग अधिकारी दुलक्ष करतात. असे स्थानिक सांगत होते.



