आर्थिकऔद्योगीकमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

आदी अम्मा ब्लिस को-ऑप. सोसायटी, विजय नगर, काळेवाडीचे पर्यावरणपूरकतेकडे एक पाऊल पुढे..

प्रतिनिधी विनोद इसरानी पिंपरी चिंचवड दि. १६ जूलै २०२५ काळेवाडी येथील तीन टॉवर आणि १२८ फ्लॅट्स असलेली ‘आदी अम्मा ब्लिस सोसायटी’ ही सध्या पर्यावरणपूरकतेच्या दिशेने पुढे सरसावलेली एक महत्त्वाची सोसायटी ठरली आहे. केंद्र सरकारच्या सौरऊर्जा प्रोत्साहन योजनेचा लाभ घेत, सोसायटीने आता ८५ केव्ही क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या सुरू केला आहे, जो सोसायटीच्या सामायिक सुविधांसाठी वापरण्यात येणार आहे.
हरित ऊर्जेकडे एक पाऊल पुढे टाकत, समिती व सोसायटीतील सर्व सदस्यांनी निसर्गासाठी विशेष काळजी घेतली. सर्वांनी मिळून मोठ्या प्रमाणावर आर्थिक योगदान दिले, ज्यामुळे हा प्रकल्प शक्य होऊ शकला. समितीने मेहनत घेत, सदस्यांना एकत्र आणले आणि दर महिन्याला लाखोंचा वीज बिल वाचवण्याचा मार्ग शोधला. आता हे बचतीचे पैसे सोसायटीच्या इतर कल्याणकारी कामांसाठी वापरले जातील.
हा सौर प्रकल्प पूर्ण होण्यास चार महिने लागले आणि अखेर १३ जुलै २०२५, रविवार रोजी आमदार श्री. शंकरराव जगताप यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. आमदारांनी सोसायटी सदस्यांचे अभिनंदन केले आणि हरित ऊर्जा स्वीकारल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी सांगितले की ही उर्जा वापरण्याची दिशा मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचेही स्वप्न आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, भविष्यात सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट (SWM) ही सोसायटीने स्वीकारल्यास, आणि एसटीपी (STP) आधीच कार्यरत असल्यामुळे, ही सोसायटी ‘ग्रीन सोसायटी’ म्हणून गणली जाऊ शकते आणि त्यास करसवलतीचाही लाभ मिळू शकतो.
आ. शंकरराव जगताप व माजी नगरसेविका सौ. निताताई पाडळे यांनी विजय नगर परिसराच्या समस्यांवर काम करण्याचा विश्वास दिला, विशेषतः पाण्याच्या समस्येवर. त्यांनी सांगितले की विजय नगरसाठी जलसाठा टाकी (water tank) ची मागणी केली आहे आणि वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले उद्यानाचे काम लवकरच पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत, जेणेकरून नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि मुले यांना व्यायामासाठी, विश्रांतीसाठी आणि खेळण्यासाठी एक उत्तम जागा मिळेल.
या उद्घाटन समारंभास माजी नगरसेविका सौ. निताताई पाडळे, श्री. विजय सुतार, समाजसेवक श्री. विलास पाडळे, सोसायटीचे चेअरमन श्री. राजकुमार वधवानी, सचिव श्री. विक्की गलानी, खजिनदार श्री. सुरेश लालवानी, श्री. सुरेश शर्मा, श्री. विजय बंसी, श्री. रोहित लालवानी, श्री. घनश्याम अडवाणी, श्री. रोहित दुसेजा, सौ. आशा नथानी, सौ. कांतातेजवानी, सौ. ज्योती पटेल, श्री. किशोर पाटील, श्री. राजेंद्र पंजाबी, श्री. राजेश आहुजा, श्री. हरेश लालचंदानी व सोसायटीतील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जितू बदलानी यांचीही उपस्थिती नोंदवण्यात आली.
आदी अम्मा ब्लिस सोसायटीच्या समितीने सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले, ज्यांनी समितीवर आणि त्यांच्या दृष्टीकोनावर विश्वास ठेवून या प्रकल्पात गुंतवणूक केली ज्याविना हा उपक्रम शक्य नव्हता अशा सर्वांचे समितीने आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!