
प्रतिनिधी पूणे दि. १४ एप्रिल २०२५ विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय संस्था अमोल गडकर व्यायाम शाळेच्या वतीने डॉ. आंबेडकर जयंतीचा खर्च टाळून पुण्यातील आस्क अनाथ आश्रम वृद्धाश्रमास जवळपास सहा महिने पुरेल इतका जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. संस्थापक दादा गायकवाड यांची कन्या साक्षी गायकवाड हिच्या हस्ते सदर सर्व जीवनावश्यक वस्तू सुपूर्त करण्यात आल्या यावेळी सदर वस्तू भेट देण्यामध्ये शहर अभियंता पुणे महानगरपालिका प्रशांतजी वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते महाराष्ट्र, पोलीस अमित बढे, विशाल जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संतोष हंगार्गी, सुजित यादव, दीपक मोरे, ईश्वर गायकवाड, महेश वाघमारे, अभिषेक यादव, राजू आल्हाट, अहमद पटेल, अशोक जाधव, फारुख शेख व संस्थेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.



