वंचित बहुजन आघाडी पुणे शहरच्या वतीने पुणे करार अधिकार दिन साजरा..

प्रतिनिधी पूणे दि. २४ सप्टेंबर २०२५ वंचित बहुजन आघाडी पुणे शहरच्या वतीने पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुणे येथील येरवडा कारागृहमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये २४ सप्टेंबर १९३२ साली झालेल्या पुणे करारमुळे भारतातील अस्पृशाना भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून शिक्षणात, नोकरींमध्ये आणि राजकीय आरक्षण मिळाले त्यामुळे हा अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, संघटक नागेश भोसले, महिला आघाडी अध्यक्षा अनिता चव्हाण, महासचिव ॲड. रेखा चौरे, शहर सचिव प्रा. बी. पी. सावळे, प्रभाकर सरोदे, अरविंद कांबळे, उमेश साळवी, श्रीनिवास दासारी, प्रवीण बागुल, प्रतिमा कांबळे, विजया ओव्हाळ, निरंजना सोनवणे, वर्षा जाधव, भारती वांजळे, अपर्णा सोनवणे, छाया बनसोडे इ. उपस्थित होते.



