
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २८ जूलै २०२५ शिवसेना पक्षप्रमुख मा. मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रस्त्यावर हालाकीचे जिवन जगत असणार्या गोरगरीब भिक्षेकरींना त्यांच्या आहे त्या जागेवर जाऊन म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी ते निगडी शक्तभक्ती चौक येथे ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम पिंपरी विधानसभा समन्वयक गणेश आहेर यांच्या वतीने राबवण्यात आला.
यावेळी उपस्थितांच्या शुभहस्ते ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना महिला जिल्हा संघटिका सौ. अनिताताई तुतारे, महिला जिल्हा समन्वयक सौ. सुशिलाताई पवार, महिला शहर संघटिका सौ. रुपालीताई आल्हाट, सौ. तस्लिम शेख, सौ. पूनम रेठे, चिंचवड विधानसभा प्रमुख हरेश आबा नखाते, गोरख पाटील, गणेश पाडूळे, हनुमंत पिसाळ, नरसिंग माने, अंकुश पवार, दिपक भक्त, दत्ता गिरी, गणेश वायभट उपस्थित होते.



