
प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुंबई दि. २९ जूलै २०२५ कांदळवन कक्ष मुंबई कांदळवन विभाग उत्तर कोकण वनपरिक्षेत्र ठाणे कांदळवन व कांदळवन सह व्यवस्थापन समिती सुरई सारंग यांच्या मार्फत २६ जुलै जागतिक कांदळवन दिवस निमित्त मौजे सारंग सुरई खाडी परिसरात स्वच्छता अभियानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, सदर कार्यक्रमात समितीचे सदस्य व ग्रामस्थ यांनी उत्तम प्रतिसाद दिला व सुमारे साधारण १५० किलो कचरा गोळा करण्यात आला तरी सदर स्वच्छता अभियानात कांदळवन सह व्यवस्थापन समिती यांचे अध्यक्ष हनुमान पाटील सचिव तथा वनरक्षक प्रशांत प्रकाश वायाळ व सदस्य मुकेश पाटील तसेच ग्रामपंचायत सरपंच व कांदळवन प्रतिष्ठान यांचे कर्मचारी उपस्थित होते.



