येलघोल बुद्ध लेणी धम्म सहल विविध सामाजिक उपक्रमांसह यशस्वीरित्या संपन्न…

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३० जूलै २०२५ ऐतिहासिक भीमसृष्टी पिंपरी या ठिकाणी लेणी संवर्धकांच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले व अभिवादन करून मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थानास भेट देण्यात आली यावेळी बुद्ध वंदना सुत्तपठन घेऊन सर्वांना निवासस्थाना विषयी माहिती देण्यात आली व निवासस्थाना समोरील जागा घेण्यासाठी आवाहन करण्यात आले होते त्या आवाहनास प्रतिसाद देत सर्वांच्या वतीने २०,०००/- रुपये या कार्यास दान करण्यात आले.
बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समिती, एकजूट लेणी प्रचार प्रसार समूह, व एम. बी. सी. पी. आर. टीम यांच्यावतीने पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील येलघोल बुद्ध लेणी या ठिकाणी धम्म सहलीचे रविवार दि.२७ जूलै २०२५ रोजी आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
सर्व टीम येलघोल बुद्ध लेणी जवळ गेल्यानंतर नेहमी प्रमाणे प्रथम वृक्षरोपण करण्यात आले.
यानंतर लेणी मध्ये व लेणी बाहेरील परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आली. मागे खराब झालेले काही बोर्ड दुरुस्त करण्यात आले. व लेणीच्या संपूर्ण माहितीचा फलक पुन्हा लावण्यात आला.
त्यानंतर मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली.
आलेल्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत सामुदायिक बुद्ध वंदना सुत्तपठण घेण्यात आले. व पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली.
या कार्यक्रमाची प्रास्तावना: मनोज गजभार लेणी प्रेमी इतिहास प्रेमी यांनी केली.
व सूत्रसंचालन लेणी प्रेमी इतिहास प्रेमी सुरज सोनकांबळे यांनी केले.
व या लेणीची माहिती प्रमुख मार्गदर्शक लेणी प्रेमी इतिहास प्रेमी गौतम कदम यांनी सर्वांना समजावून सांगितली.
लेणीप्रेमी इतिहास प्रेमी प्रफुल पुरलकर यांनी महाराष्ट्रातील लेण्यांच्या निर्माण कार्याविषयी थोडक्यात माहिती दिली.
पालीभाषा अभ्यासक व विविध लिप्यांचे अभ्यासक लेणीप्रेमी इतिहास प्रेमी राजू भालेराव यांनी सर्व लेण्यांचे संवर्धन कशा प्रकारे करता येईल याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले.
लेणी प्रेमी इतिहास प्रेमी सारीश उर्फ दादुस डोळस यांनी लेणी प्रचार प्रसार कशा प्रकारे करता येईल याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले.
पालीभाषा अभ्यासिका व विविध लिप्यांच्या अभ्यासिका लेणीप्रेमी इतिहास प्रेमी सुजाताताई नवघरे यांनी हा आपला प्राचीन वारसा कशाप्रकारे जपला पाहिजे याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले.
लेणी संवर्धकांना सतत मदत करणारे व त्यांची येलघोल बुद्ध लेणी या ठिकाणी आल्यानंतर सर्व व्यवस्था करणारे आमचे मार्गदर्शक राजेंद्र घारे यांनी लेणीपर्यंतच्या रस्त्याचे व लेणी परिसरात ग्रामपंचायतच्या वतीने सुशोभीकरणाचे काम करण्यात येईल असे सांगितले.
लेणीप्रेमी इतिहास प्रेमी विकास खरात यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले व यापुढेही असेच सहकार्य करण्याचे आवाहन केले.
गावातील ग्रामस्थ विलास कदम व अजय कदम हे सतत लेणी व लेणी परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करत असतात.
पिंपरी चिंचवड पुणे येथून निघालेल्या बसची नाश्त्याची व्यवस्था करणारे
व येलघोल बुद्ध लेणी येथे आलेल्या सर्व सदस्यांची जेवणाची व्यवस्था करणाऱ्या दानदात्यांचे सर्व लेणी संवर्धकांच्या वतीने आभार मानण्यात आले.
या धम्म सहलीस. पिंपरी चिंचवड पुणे. मुंबई. अकोला. नागपूर. आंध्र प्रदेश. बीड या ठिकाणाहून सूमारे २०० पेक्षाही जास्त सदस्य उपस्थित होते.
प्रथमच पाली भाषा अभ्यासक डॉक्टर वैशाली सतीश जगताप, साळवी मॅडम, कडलक मैडम, जयश्री भिगावडे
पो. भीमराव माने, उपस्थित होते
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवी कांबळे, महायान मसुरे तात्या, सुरेश वाघमारे, राहुल बनसोडे,
रविद्र शेगावकर, मंदाकिनीताई गायकवाड, संगीताताई भंडारे, यांनी विशेष प्रयत्न केले.



