
प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुंबई दि. ०१ ऑगस्ट २०२५ मुंबईतील आणखी एक मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि माजी विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.
मराठी शाळेची इमारत धोकादायक असल्यामुळे स्थलांतराच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली. स्थानिक नागरिक, पालक आणि माजी विद्यार्थ्यांनी शाळा वाचवण्याचा प्रयत्न राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यांवरून ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध दर्शवला जात आहे. त्यानंतर सरकारने पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं. एकीकडे मराठी भाषेचा मुद्दा राजकीय नेत्यांनी लावून धरलेला असताना ठाण्यानंतर आता मुंबईतही एक मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. यावरून याच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सरकारच्या अनास्थेमुळे आणखी एक सरकारी मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. भांडुपच्या खिंडीपाडा परिसरात १९७१ साली सुरू झालेली पालिकेची मराठी शाळा बंद मूळ ठिकाणी बंद झाली. त्यानंतर येथील विद्यार्थ्यांना ३ किमी दूर पालिकेच्या शाळेत पाठविण्यात आलं. यावरून स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
खिंडीपाडा मनपा मराठी शाळेत शंभर पेक्षा जास्त विद्यार्थी होते. मात्र या शाळेची इमारत धोकादायक झाली. त्यानंतर इमारतीच्या दुरुस्तीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून दुरूस्ती बाबत परवानगी मिळत नाही म्हणून काही दिवस शाळा खाजगी जागेत भरवली जात होती. तिथून ती शाळा तुलशेतपाडा येथे स्थलांतरित केल्याने पालकांनी इतर पर्याय स्वीकारले आहेत. खिंडीपाड्यातील या शाळेत कष्टकरी, आदीवासी गरीब लोकांची मुले शिक्षण घेत होते. पण आता कदाचित यांना शिक्षणापासून वंचित रहाण्याची वेळ येणार आहे ? कारण खाजगी शाळेतील शिक्षण या लोकांना परवडणारे नाही. या निर्णयावर पालक, विद्यार्थी वर्गात नाराजी वाढत आहे. सरकार याची दखल घेणार का असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. गरीबांनी शिक्षणापासून वंचित रहावे का ?
मनूस्मृती लागू होत असल्याची ही सूरूवात आहे का? कारण गोरगरीबांची मूले शिकली तर जागरूक होतील व सरकारला प्रश्न विचारतील म्हणून पहिला वार हा शिक्षणावर आहे का? कारण प्रश्नच नाही तर उत्तर ही नाही असे काही ठरवले आहे का ?



