उत्सवमहाराष्ट्रविशेषसामाजिक

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाच्या नियोजन बैठकांचा धडाका सुरू

सिंहस्थ कुंभमेळा दृष्टीने सर्व यंत्रणांचे समन्वयातून सुक्ष्म नियोजन आवश्यक- जिल्हाधिकारी जलज शर्मा

प्रतिनिधी रेणुका गायकवाड – महाले, नाशिक दि. ०३ डिसेंबर, २०२४ नाशिक शहर त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने यंत्रणांनी आरखडा सादर करतांना आवश्यक सर्व बाबींचा आराखड्यात समावेश करावा व परस्पर समन्वयातून सुक्ष नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपस्थित अधिकाऱ्याना दिल्या.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा साप्ताहिक बैठकीत जिल्हाधिकारी श्री. शर्मा बोलत होते. यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, प्रदीप चौधरी, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी डॉ. श्रेया देवचके, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी डॉ. श्रेया देवचके यांनी सुधारीत ५२२ कोटींचा सिंहस्थ कुंभमेळा आराखड्याचे सादरीकरण केले. सिंहस्थ कालावधीतील नाशिक शहर, श्री क्षेत्र कावनई, सर्वतीर्थ टाकेद येथील प्रस्तावित रस्त्यांची कामे, जिल्ह्यातील विश्रामगृह इमारतींची कामे, भाविकांसाठी करावयाच्या सुविधा असा एकूण ४० कोटींच्या आराखड्याचे सादरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती शर्मा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. पालवे यांनी केले. यांनतर नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयाचा सिंहस्थ विषयक आराखडा पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी तर महावितरण वितरण विभागाचा आराखडा अधिक्षक अभियंता डी.एच. पडळकर यांनी सादर केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!