
प्रतिनिधी यलघोल स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२३ लेणी मुक्ती संवर्धन मोहीमी अंतर्गत गेल्या काही महिन्यांपासून पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील यलघोल या बुद्ध लेणी संवर्धन मोहिमेचे कार्य लेणी संवर्धक, पुणे जिल्हा यांच्या माध्यमातून केले जात आहे. हे कार्य पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी दिनांक. 15 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 1 वाजता विशेष संवर्धन मोहीम तसेच कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस पुणे जिल्ह्यामधील शेकडो उपासक/उपासीका, लेणी संवर्धक, लेणी प्रेमी व भंन्ते धंम्मानंद, “मूकनायक न्यूज पेपरचे” वरिष्ठ पत्रकार लक्ष्मण रोकडे, अरूण मैराळे, प्रल्हाद कांबळे, बलराम काकडे, ग्रामस्थ राजेंद्र घारे, ग्रामस्थ मनोज कदम, तसेच लोकहिताय चॅनलचे संपादक दिलिप देहाडे आणि मंदाकीनी गायकवाड, साधनाताई मेश्राम, सत्यशीला का़ंबळे, आनिता बागडे, सतिश गायकवाड, स्वरूप गायकवाड, सुजाता ताई नवघरे, राजू भालेराव, रवी कांबळे, महायन मसुरे, कपिल कांबळे, राजू कांबळे, राहुल सोनवणे, संजय बनसोडे, पोपट भालेराव, सुधिर कडलक, नाना शिलवंत, रोहिनी लादे, कौशल्या गजभार, सुरज कसबे, राजू सरतापे, राहुल कांबळे, कोमल तुरुकमारे, गायकवाड, सुरेश वाघमारे, बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समिती महाराष्ट्र, तथागत ग्रुप, प्रबुध्द मैत्री संघ आदर्श नगर मोशी यांनी व अशा असंख्य शेकडो उपासक उपासिकांनी उपस्थिती लावली होती. या कार्यशाळेत खालील प्रमाणे महत्त्वपूर्ण विषय तसेच संवर्धन कार्य संपन्न झाले..
बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समिती चे संस्थापक अध्यक्ष प्रथम लेणी संवर्धक दिवंगत पी. व्ही. मसुरे (दादा) यांच्या कार्यास समर्पित आदर्श म्हणून या मोहिमेचे दोन फलक लावण्यात आले. आत्तापर्यंत झालेल्या कार्याचा आढावा तसेच पुढील रूपरेषा लेणी संवर्धन तसेच मोहिमेचे गांभीर्य यावर चर्चा झाली.



या कार्यास पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी ज्या उपासक/उपासीका, लेणी संवर्धक, लेणी प्रेमी यांनी केलेल्या श्रम/आर्थिक दान/ वस्तू स्वरुपी दान दिल्या बद्दल गुणगौरव पत्रक देण्यात आले
आयु. कपिल कांबळे तसेच आदरणीय महायान मसुरे यांच्या माध्यमातून खीर दान करण्यात आली.
सायंकाळी 4:30 वाजता प्रबुद्ध मैत्री संघाचे आगमन झाले लेणी संवर्धक टीमने त्यांचे वतिने त्यांचेही स्वागत करण्यात आले.
आदरणीय भंते धम्मानंद यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी लेणी संवर्धकची टीम तसेच सर्व उपासक उपासिका उपस्थित होते.
महाराष्ट्रातील बुद्ध लेण्या आणि त्यांचे वास्तव काय आहे हा विषय या प्रसंगी तळमळीने सांगण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच लेण्यांना जिवंत पणा कसा देता येईल यासाठी लागणारे प्रयत्न आणि पुरातत्व विभागाची मत्तेदरी या विषावर गहण चिंतन करण्यात आले.
या मोहिमेस जिवंतपणा तसेच सहकार्य करणाऱ्या तमाम उपासक/उपासीका, लेणी संवर्धक, लेणी प्रेमी यांचे आभार मानले गेले आणि उपस्थिती करीता अभिनंदन ही करण्यात आले.
ज्या उर्वरित उपासक/उपासीका, लेणी संवर्धक, लेणी प्रेमी यांना गुणगौरव पत्रक प्राप्त झाले नाही त्यांना लवकरच देण्यात येईल असे लेणी संवर्धक, पुणे जिल्हाचे मनोज गजभार यांनी या वेळी सांगीतले.



