महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

पुणे म.न.पा. प्रशासनाच्या विरोधात म.न.से. वाघोलीच्या वतीने रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन..

प्रतिनिधी पूणे राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने , पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, वडगावशेरी विधानसभा मतदार संघांचे विभाग अध्यक्ष सुनिलभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली वाघोली येथील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात व वाघोलीच्या सार्वजनिक समस्याबाबत पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाघोलीच्या वतीने बैफ रोड चौक व आव्हाळवाडी चौक येथे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले.
यावेळी खड्ड्यांच्या भोंवती रांगोळी काढून, खड्ड्याला फुले वाहून, हार घालून नारळ फोडण्यात आले.
व खड्ड्यांमध्ये झाडे लावण्यात आले.
यावेळी वाघोलीतील सर्व रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावेत. अंतर्गत जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास करण्यात यावा, वाघोलीतील बायपास रस्त्याचे काम लवकरात – लवकर चालू करावे, वाघोलीचा पाणी प्रश्न सोडवावा, रस्ता ओलांडण्यासाठी स्कायऑक उभारण्यात यावे, सुलभ शौचालय उभारण्यात यावे, कचरा प्रकल्प उभारण्यात यावा, वाघोली बाजारतळाची स्वच्छता करण्यात यावी, रस्त्यावरील पथदिवे चालू करावेत व गरज तेथे नवीन बसवावेत अश्या असंख्य मागण्या आंदोलनात करण्यात आल्या, या आंदोलनात शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत त्यांच्या अडचणी सांगितल्या तर महिला भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक देखील आंदोलनात मोठया प्रमाणात सहभागी झाले होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो.. हिंदूजननायक राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो…अश्या घोषणा देण्यात आल्या.
तर सरकार, प्रशासन, भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदार यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

वाघेश्वर मंदिर ते केसनंद फाटा दरम्यान नुकतेच 11 कोटी रुपये खर्च करून रस्ता करण्यात आला पण यावार सर्वत्र खड्डे पडले आहेत, पेवर ब्लॉक उखाडले आहेत, सर्व चेंबर तुडले आहेत या निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ही आंदोलकांकडून करण्यात आली.

वाघोलीतील नागरी प्रश्न सुटले नाही तर मनसे स्टाईलने पुणे महानगरपालिकेवार यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा वाघोली मनसे शहर अध्यक्ष प्रकाश जमधडे यांच्या कडून देण्यात आला.

यावेळी अजय पालवे, विकास गायकवाड, आनंद सिसाले, दिनेश कासदे, रतिश मलहोत्रा, विशाल कळाने, रामचंद्र चोपडे, अक्षय चोपडे, स्वप्नराज खेडकर, सुभाष जाधवर, सागर विसपुते, नवनीतलाल गुगळे, गायकवाड काका, दीपक कुमार, महेश लोखंडे, वाघोली महिला शाखा अध्यक्ष वनिताताई जमधडे, लीना चोपडे, सविता अंबोरे, जयश्री बोराडे, वर्षा सूर्यवंशी, सारिका जाधव, अश्विनी जगताप, गीता कुमार, त्याबरोबरच विविध पत्रकार, पोलीस प्रशासनातील अधिकारी व महाराष्ट्र सैनिक, शाळेतील विद्यार्थी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!