पोलिसमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिक

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या चिंचवड वाहतूक विभागाच्या वतीने ‘एक दिवस कनिष्ठ महाविद्यालयासाठी उपक्रम – जनजागृती मोहिमे’अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान संपन्न…

विशेष प्रतिनिधी भारत प्रधान पिंपरी चिंचवड दि. ०७ ऑगष्ट २०२५ श्री. फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या चिंचवड वाहतूक विभागाच्या वतीने ‘एक दिवस कनिष्ठ महाविद्यालयासाठी उपक्रम – जनजागृती मोहिमे’अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी आदरणीय ॲड. राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा तसेच संस्थेचे सहाय्यक सेक्रेटरी आदरणीय श्री. अनिल कुमारजी मोतीलालजी कांकरिया यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात ‘नवकार महामंत्रा’च्या पवित्र जापाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. सौ. नवले सुनिता यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र बर्गे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना ‘वाहतुकीचे नियम व त्या सर्व नियमांच्या पालनाचे महत्व’ पटवून सांगितले. याप्रसंगी त्यासमवेत पी. एस.आय. केवल एस. एस., पोलीस हवलदार सरोदे ए. एस., दशरथ खरडमल व कॉलेजचे उपप्राचार्य श्री. अनिल गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. चानोदिया स्नेहल यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या कला व वाणिज्य विभागप्रमुख श्रीमती. भळगट साधना, विज्ञान विभाग प्रमुख सौ. कालेकर तेजस्विनी, एम. सी. व्ही.सी विभागप्रमुख श्री. लोखंडे भाऊसाहेब, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. तांबोळी ताहेरा व सौ. चानोदिया स्नेहल, सर्व शिक्षकवृंद व विदयार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!