आरोग्यदेश-विदेशमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिक

भिवंडी शहराच्या बाहेर खड्डेमय रस्ते आणि ट्राफिक जाम रोजचीच डोकेदुखी ठरत आहे!

भ्रष्टाचारी पक्षात तरी सरकार म्हणते “ना खावूंगा ना खाने दूगां” ?

प्रतीनीधी सतिश वि.पाटील मुंबई दि. १२ ऑगस्ट २०२५
याला जबाबदार कोण रस्त्याचे, पुलाचे ठेकेदार काय समाजसेवा म्हणून निस्वार्थ व निशुल्क काम करत आहेत का ? जनतेकडून अनेक टॅक्स वसूल करून ही सेवा सुविधांचा अभाव! जनतेने निवडून दिलेले लोक प्रतिनीधी कशा साठी असतात! सरकारला जाब कोण विचारणार? कामाचा निकृष्ट दर्जा, महीन्यातच रस्त्यावर खड्डे, पुल बनवतानाच कोसळणे, काम पुर्ण करुन देण्याची नियमावली यावर देखरेख कोणाची असते भ्रष्टाचारमुक्त सरकार सत्तेवर आल्यानंतर ही येरे माझ्या मागल्या “तो भ्रष्टाचारात अडलेला व्यक्ती कोणीही असो काही फरक पडत नाही तो पक्षात विलीन करून घेतला जातो”. ईडी, सिबीआय तर नावालाच शिल्लक आहे, अशा प्रत्येकाला पक्षात मंत्रीपद दिल्यावर भ्रष्टाचार मुक्त सरकार कसे बोलू शकता? तो चार पट वाढतच आहे, मग सर्व स्थरांतून वसूली ही जनतेकडून केली जाते ! आणि जनता मुकाटपणे खिशाला बसलेला फटका सहन करत आहे, जनतेच्या उद्रेकाची वाट पाहत आहे का हे सरकार? सरकार म्हणून आपले काहीच कर्तव्य नाही का ? फक्त अमुकतमुक विषय रोज उभे करून टाळाटाळ करीत सत्तेचा उपयोग करीत आहेत का ? आजपर्यंत किती लोकांवर ईडी, सिबीआयची कारवाई झाली आणि किती जेलमध्ये आहेत! शिक्षण, आरोग्य, अन्नदाता शेतकरी यावर काही आजपर्यंत उपाय योजना करण्यात आली का नाही? सरकारी शाळा बंद पडत आहेत आणि खाजगी शाळेत मनमानी कारभार चालू आहे, तसेच आरोग्याचेही तिनतरा वाजले आहेत, खाजगी हाॅस्पिटलची भरमसाठ बिले, औषधी दुकानाची बिले अमुक एक औषध याच ठिकाणाहून आणा असा हाॅस्पिटलचा आग्रह, आणि जे पन्नास वर्ष आधीची सरकारी हाॅस्पिटल आहेत त्यात पण सुविधां मिळणे कठीणच झाले, शेतकरी हवालदिल आहे मग जनतेची होणारी अवहेलनाच नाही का ? आज ट्रॅफिकची डोकेदुखी रोजचीच ठरत आहे !
शहराच्या बाहेर जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर मोठ्या संख्येने खड्डे झाले आहेत तर काही ठिकाणी अर्धवट असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे या रस्त्यावरून भिवंडीकरांना जाणे हलाखीचे झाले आहे. त्यातच खड्ड्याचा आणि रस्त्यांच्या अर्धवट कामांमुळे शहराच्या चारही बाजुंना असलेल्या मार्गावर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे भिवंडीकरांच्या जीवाचे हाल सुरू आहेत.
या प्रमुख समस्यांकडे एकमेकांवर आरोप करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांचे आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असल्याने या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या नोकरवर्ग, व्यापारी आणि प्रवासी वर्गाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊन त्यांचे जीवन धोक्यात आले आहे.
भिवंडी शहराच्या बाहेर जाणारे मार्ग– भिवंडी-कल्याण, भिवंडी-ठाणे (बायपास माणकोली मार्ग), भिवंडी-ठाणे (कशेळीमार्ग), भिवंडी-पडघा-नाशिक (चावींद्रा मार्ग), भिवंडी-वसई (चिंचोटी मार्ग), भिवंडी-पारोळ (शेलारमार्ग), भिवंडी-वाडा (अम्बाडीमार्गे) हे भिवंडी शहरातून शहराबाहेर पाडण्यासाठी प्रमुख मार्ग असून या सर्व मार्गावर खड्डे झाले असून या मार्गावर दररोज नियमित वाहतूक कोंडी होत आहे. या सर्व मार्गावर काही ना काही कामे सुरु असल्याने गेल्या काही महिन्यांपासून नेहमी वाहतूक कोंडी होत आहे. या सर्व मार्गावरून नियमित नोकरदार आपापल्या कार्यालयात जाण्यासाठी दररोज प्रवास करीत आहेत. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शनिवार-रविवार सुट्टी असते मात्र खाजगी कार्यालयात काम करणाऱ्या नोकरदारांना बारा-बारा तास काम करण्यासाठी अनेकांना या समस्यांमुळे २-४ तासांचा प्रवास दररोज करावा लागतो. तेच हाल व्यापारी आणि प्रवाश्यांचे आहे. या मार्गावरून जाताना वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या खाजगी-सरकारी कर्मचाऱ्यांना लेट मार्क मिळतो. त्यामुळे त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होतोच. त्याच प्रमाणे या कर्मचाऱ्यांच्या शरीरावर परिणाम होऊन त्यांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यातच कार्यालय गाठण्यासाठी धावपळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कधी-कधी छोटे मोठे अपघात देखील होतात. अशा विविध दुष्परिणामांमुळे त्यांचे जीवन धोक्यात आले आहे. या बाबत ना राजकीय पुढारी, ना संबंधित शासकीय अधिकारी, ना ठेकेदार विचार करीत आहेत. या सर्व बाजूच्या मार्गाने म्हणजे जव्हार, पालघर-बोईसर, वाडा, पारोळ, वसई, ठाणे, कल्याण, मुरबाड, शहापूर, पडघा, नाशिक या दरम्यानच्या विविध गावातून सुमारे १० हजारापेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी आपली नोकरी टिकविण्यासाठी दररोज हलाखीचा प्रवास करीत आहेत.
याबाबत भिवंडीतील सार्वजनिक बांधकाम विभागातील उप-अभियंता दत्तू गीते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईलवर संपर्क होऊ शकला नाही. तर भिवंडीतील वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शरद ओहोळ यांनी सांगितले कि, विविध योजनांतून सुरु झालेल्या रस्त्यांमधील वाहतूक ठाण्याच्या मार्गावर वाढली असून त्याचा परिणाम माणकोलीपुढील अर्धवट पुलामुळे होत आहे. या वाहतुकीला वेळेत पुढे जाण्यासाठी मार्ग नाही त्यामुळे वाहतूक कोंडी होते तर गोदामाकडे जाणारी वाहने वाहतुकीला अडथळा करतात. त्यामुळे ठाणे मार्गाकडे वाहतूक कोंडी होत आहे. खारीगाव नवीन पूल सुरु झाल्यानंतर ही वाहतूक सुरळीत होईल, असे सांगितले गेले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!