गून्हापोलिसमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पोलीस ठाणे सदर बाजार डिबी पथकाकडून प्रतिबंधीत गुटखा व वाहन असा एकुण ३,५९,१४०/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त..

प्रतिनिधी जालना दि. १५ ऑगस्ट २०२५ दोन दिवसांनपूर्वी दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी पोलीस ठाणे सदर बाजार जालना, डिबीचे प्रमुख शैलेश म्हस्के हे डीबीचे स्टाफसह पेट्रोलींग करीत असताना त्यांना मंगळबाजार येथे एक इसम नामे नजीर छोटेमिया पठाण रा. मंगळबाजार हा त्याचे घरासमोर टू व्हीलर IQUBE MH21CF7108 यावर एका थैलीमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा विक्री करतांना मिळुन आला त्यास ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने प्रतिबंधीत असलेला गुटखा व पानमसाला हा त्याचा भाऊ नामे नसीर खान छोटेमिया खान रां मंगळबाजार जालना याचे सांगणे वरन विक्री करीत असून गूटख्याचा साठा हा त्यांचेच घरात ठेवलेला असल्याचे सांगितले वरुन दोन पंचासमक्ष त्याचे राहते घराचे वरील खोलीमध्ये आम्ही पोस्टे स्टापसह सदर ठीकाणी १२:१५ वा. पंचासह छापा मारला असता सदर ठिकाणी पांढ-या रंगाच्या ०४ गोण्यांन मध्ये गोवा १००० गुटखा असे लेबल असलेले एकूण २६० पाकिट व खाकी रंगाचे ०४ कार्टून मध्ये Siggnature पान मसालाचे एकूण २४० पाकीट व एका पाढ-या गोणीमध्ये Action Scented Tobacco चे १०८ पॉकेट असा एकूण २,०९,१४० रूपयाचा गुटखा व एक IQUBE MH 21 CF 7108 दूचाको जिची किमत १,५०,०००/- असा एकूण ३,५९,१४० रूपयाचा मुददेमाल मिळुन आल्याने तो जप्त करून सदर इसमाविरुध्द पोस्टे सदर बाजार जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा.पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, मा. अप्पर पोलीस अधिक्षक आयूष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकणों यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक संदीप भारती यांचे नेतृत्वात डी.बी. पथकाचे प्रमुख पोउपनि शैलेश म्हस्के, पोहेकों १०७० धनाजी कावळे, पोहेकों /१३९३ नजीर पटेल, पोकों १३०८ भगवान मुंजाळ, पोकों/९६३ दूर्गेश गोफणे, पोकों/१६९८ धंनजय लोंढे, मपोहेकों/मगरे तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी प्रज्ञा सूरसे यांचे मदतीने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!