अभिवादनउत्सवमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरशुभेच्छासामाजिक

मुलुंड मध्ये १५ आॉगस्ट ७९वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात साजरा !..

प्रतिनिधी सतिश वि.पाटील मुंबई दि. १६ ऑगस्ट २०२५
काल भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सर्व स्तरातून अधिकारी कर्मचारी एकत्र आले होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झाला. महात्मा गांधी, नेहरू आणि सरदार पटेल यांसारख्या महान नेत्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्य दिन आपल्याला आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देतो. मुलुंड पोलिस ठाणेउपआयुक्त परिमंडळ ७
राकेश ओला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सर्व मान्यवर उपस्थित होते. संदीप मोरे सहायक पोलिस आयुक्त मुलुंड विभाग अजय जोशी वरीष्ठ पोलिस निरीक्षक मुलुंड पोलिस ठाणे, स्थानिक आमदार व नगरसेवक, मुंबईचे पत्रकार सतिश वि.पाटील, सर्व पोलिस सहकारी वर्ग, मुलुंडचे सर्व नागरीक यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून १५ आॉगस्ट २०२५ रोजी स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाला सलामी व मानवंदना देण्यात आली.
मॉडेला चेक चौकी येथे अजय जोशी वरीष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तसेच महाराणा प्रताप चौक चेक नाका येथेही मान्यवरांकडून ध्वजारोहण करण्यात आले.
मुलुंड तहसीलदार ७९वा स्वातंत्र्यदिन साजरा मुलुंड तहसीलदार येथे मा.कल्पना सुनंदा शंकर गोडे उपविभागीय अधिकारी, पुर्व उपनगरे (मुंबई, उपनगर जिल्हा) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमास सर्व वरीष्ठ अधिकारी आणि सर्व मुलुंड कोर्ट बारचे वकील तसेच नागरिक उपस्थित होते.
दिलीप सावित्री जक्काप्पा रायाण्णावर तहसीलदार कुर्ला (मुलुंड ), राकेश विजया बळीराम सांवत नायब तहसीलदार उपविभागीय अधिकारी कार्यालय (पुर्व उपनगर), राकेश आशा आनंदा दाभाडे नायब तहसीलदार( महसूल), तसेच शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून ध्वजारोहण कार्यक्रमास साजरा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!