
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. ३१ डिसेंबर २०२४ नववर्षाच्या जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. पोलिस आयुक्तालयांतर्गत विशेष बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री ते ०१ जानेवारी २०२५ या कालावधीत संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या ठिकाणी कडक बंदोबस्त..
नववर्षानिमित्त धार्मिक स्थळे, मंदिरे, मशिदी, मॉल, हॉटेल, लॉज, सार्वजनिक ठिकाणी विशेष गस्त घालण्यात येणार आहे. महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी, वाहनांची तपासणी.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. रात्रीच्या वेळी मद्यपान करून वाहन चालवणे, वेगाने वाहन चालवणे आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ निर्माण करणे. यावर विशेष लक्ष ठेवले जाईल.
ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण..
नववर्षाच्या उत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषणाची मर्यादा ओलांडण्याच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. अशात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत.
कोणत्या वाहनचालकांवर होणार कडक कारवाई..
आपल्या वाहनातून अनधिकृतपणे आवाज करणाऱ्या किंवा ट्रिपल सीट वाहने चालवणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येईल. याशिवाय नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान सार्वजनिक ठिकाणी आवाज करणे किंवा गैरवर्तन करणे. त्यांच्यावरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
विशेष पोलिस पथके तैनात..
पोलीस आयुक्त ०१, सहाय्यक पोलीस आयुक्त ०६, पोलीस निरीक्षक ४६, सहाय्यक निरीक्षक/उपनिरीक्षक १५४, पोलीस हवालदार १५२०, RTO पथक ०१, SRPF पथक ०५, स्ट्रायकिंग ०८ आणि वॉर्डन ७० संपूर्ण शहरात नियुक्त करण्यात आले आहेत.



