अल्पवयीन १४ वर्षीय मुलीचा विनयभंग करणारा, आरोपी गजाआड होत नाही म्हणून भर पावसात अमरण उपोषण..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड ३० जून २०२३ सकाळी ११ वाजल्यापासून श्रीमती मधु लक्ष्मण डिकाव वय ४७ या भर पावसात भिजत आपल्या मूलींन सोबत देहूरोड पोलिसांच्या होत नसलेल्या कारवाईच्या विरोधात अमरण उपोषणाला बसलेले आहे. या कूटूंबातील अल्पवयीन १४ वर्षाच्या मूलीचा व २३ वर्षीय सूनेचा दोन दोन वेळा विनयभंग होऊन ही पोलिस आरोपीला न पकडता इतरांना गजाआड करते जे निरपराध आहेत पण खर्या आरोपीला अद्याप ही गजाआड केले नाही. या घटने नंतर जवळपास पंधरा दिवस उलटून गेलीत पण आरोपी गजाआड केला नाही या गोष्टीने त्रस्त होवून पोलिसांच्या बोटचेपीपणाला कंटाळून डिकाव कूटूंब अमरण उपोषणाकरीता पिंपरी येथील ( भिमसृष्टी ) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे भरपावसात फक्त न्यायाच्या मागणी करिता अमरण उपोषण करत आहे. रात्री उशिरा श्रीमती मधु डिकाव यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना वाय. सी. एम. हाॅस्पिटल मधे दाखल करण्यात आले आहे. या वेळी नॅशनल सोशलाईट पार्टीच्या स्मिता देशपांडे व रंजित सपकाळ हे येथे उपस्थित होते.



