
प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. १४ मे २०२६ सरकारी अधिकारी देखिल सुरक्षित नाहीत आपल्या राज्यात?
विरारच्या शिरगाव परिसरात मंडल अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचे सहकारी आत्माराम पाटील यांचा मृत्यू झाला आहे.
हल्ल्यामागील कारण अस्पष्ट
पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये महसूल विभागातील अधिकाऱ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विरारच्या शिरगाव परिसरातील खदानीजवळ मंडल अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी लाकडी दांड्याने हल्ला केला. या घटनेत त्यांचे सहकारी आत्माराम पाटील यांचा मृत्यू झाला असून प्रभाकर पाटील गंभीर जखमी झाले आहेत.
हल्लेखोरांनी अधिकाऱ्यांच्या वाहनाचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर पाटील आणि त्यांचे सहकारी आत्माराम पाटील हे कामानिमित्त शिरगाव परिसरात गेले होते. यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.
या हल्ल्यात आत्माराम पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या घटनेमुळे महसूल विभागात शोककळा पसरली आहे.
हल्लेखोरांनी प्रभाकर पाटील यांच्या वाहनाचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित होता का, याचाही तपास पोलीस करत आहेत. घटनेची माहिती मिळताच विरार पोलीस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसराचा पंचनामा करून पुरावे गोळा करण्यात आले आहेत.
हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट
हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिकृत कामकाज, जमीन व खननाशी संबंधित वाद किंवा अन्य कारणांमुळे हा हल्ला झाला असण्याची शक्यता तपासली जात आहे. या घटनेनंतर शिरगाव आणि विरार परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सरकार मायबाप काय चालू आहे राज्यात सरकारी अधिकारी देखील सुरक्षीत नाही युपी, बिहार सारखी परिस्थिती, गुन्हेगारांना पोलिस व कायद्याचा धाक उरला नाही? दिवसेंदिवस बलात्कार, भ्रष्टाचार घटनांचे प्रमाणात वाढ होत आहे. या गुन्ह्यात गुन्हेगार कोणीही असो त्याचेवर कठोरात-कठोर कारवाई झालीच पाहिजे आणखी किती नाहक बळी जाणार गृह मंत्रालय कधी जागे होणार?



