घरफोडीच्या सराईत गुन्हेगारास जिल्हा बस्ती, उत्तर प्रदेश येथुन अटक-दोन गुन्हे उघड..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २५ ऑक्टोंबर २०२३ चिखली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक वर्कशॉप, स्क्रॅब दुकान, स्मॉल इंडस्ट्रीज असे अनेक लहान मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक असुन गेले काही दिवसांपासुन वर्कशॉप व स्क्रॅब दुकानांमध्ये चो-यांचे प्रमाण वाढले होते. त्याला प्रतिबंध करण्याचे दृष्टीने चिखली पोलीस स्टेशनकडील तपास पथकांमार्फत रात्रीचेवेळी पेट्रोलिंग नेमण्यात आली असुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने चिखली पोलीस स्टेशन मार्फत वेळोवेळी ट्रॅप लावण्यात येत आहेत.
चिखली पोलीस स्टेशन गु.रजि. नंबर ६७६/२०२३ भादवी कलम ३९४, ४५४, ४५७, ३८०, ३२४, ३२३, ३४, ५११ हा गुन्हा दिनांक १५/१०/२०२३ रोजी दाखल करण्यात आलेला होता. त्यामध्ये आरोपीनी फिर्यादी श्री. अजिझु
रहिमान उबैदुल्ला खान यांचे हरगुडे वस्ती, चिखली, पुणे येथील बर्मा इंडस्ट्रीज या शॉपमध्ये घुसुन त्याना मारहाण करून त्याचे शॉपमध्ये ठेवलेला १,५०,००० /- रुपये किंमतीचा, २०० किलो वजनाचा, कार्बाईड इनसर्ट या नावाचा स्क्रॅब माल घरफोडी करुन चोरुन नेला होता.
यांतील फिर्यादी यांचे दुकानातुन यापुर्वी देखील कार्बाईट इनसर्टचा स्क्रॅबचा, ४६७ किलो वजनाचा, ३,५०,००० /- रुपये किंमतीचा माल चोरीस गेला होता त्याबाबत चिखली पोलीस स्टेशन गु.रजि. नंबर ६०४/२०२३, भादवी कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे हा गुन्हा दाखल होता.
वरील दोन्ही गुन्हे हे सराईत आरोपींनीच केले असण्याची दाट शक्यता असल्याने चिखली पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या कर्मचा-यानी परीसरातील २०-२२ ठिकाणची सिसिटिव्ही फुटेज चेक केली असता त्यांना सदरच्या गुन्हयातील एक आरोपी हा सनी विनोद गौड वय ३२ वर्षे, राह. दत्तमंदीराजवळ, बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी, पुणे हा असल्याचे व त्याने त्याचे ईतर साथीदाराचे मदतीने सदरच्या घरफ़ोड्या व जबरी चो-या केल्याचे त्याचे तपासात समोर आले.
त्यानुसार तपास करुन पाहिजे आरोपी संजय राणावत याचे मोबाईल फोन नंबरचे सीडीआर प्राप्त करून त्यांचे तांत्रीक विश्लेषण केले असता आरोपी संजय राणावत हा उत्तरप्रदेश याठिकाणी असल्याचे लोकेशन प्राप्त झाले होते. त्याप्रमाणे
चिखली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर काटकर यांनी तात्काळ सपोनि / श्री. तौफिक सय्यद व पोलीस स्टाफ असे पथक उत्तर प्रदेश येथे रवाना केले. त्याप्रमाणे आरोपी नामे संजय रामप्रसाद रानावत, वय – ३२ वर्ष, रा.
मुळगांव- माझा मानपुर, ता. हरेय्या, जि. बस्ती राज्य उत्तरप्रदेश, सध्या हरगुडेवस्ती चिखली पुणे यास गौर पोलीस स्टेशन जि. बस्ती राज्य उत्तर प्रदेशचे हद्दीतुन ताब्यात घेवून त्यास चिखली पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. त्याकडे
सखोल तपास केला असता त्याने कार्बाईट इनसर्टचा माल हा त्याचे मित्र सनी गौड यानी मिळुन चोरलेला असल्याचे सांगुन सदरचा माल जमशेर इक्बाल चौधरी, याचे मार्फ़तीने औरंगाबाद या ठिकाणी विकला असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे स, पो.नि सय्यद व टिमने औरंगाबाद या ठिकाणी जावुन गुन्हयातील २,७५,०५३ /- रुपये किमतीचा कार्बाईड
इनसर्ट या नावाचे स्क्रॅब मटेरियल एकुण वजन ३६७ किलो. असा माल हस्तगत केलेला आहे. सदरचा माल हा चिखली पोलीस स्टेशन गु.रजि. नंबर ६०४/२०२३, भादवी कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे या गुन्हयातील चोरीस गेलेला
माल असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.
तसेच गुन्हयातील निष्पन्न आरोपी २) सनी विनोद गौड वय २१ वर्षे, राह. दत्तमंदीराजवळ, बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी, पुणे, ३) जमशेर इकबाल चौधरी वय ४६ वर्षे, सध्या राह. अशरफ नगर, अल्फीया टॉवरचे समोर, गल्ली नंबर ५, कोंढवा, पुणे मुळ राह. ग्राम मानवा ता. बानवापुर, जि. सिध्दार्थनगर, राज्य उत्तरप्रदेश यांना तांत्रीक विश्लेषणाचे आधारे तपास करुन तात्काळ अटक करण्यात आली असुन आरोपी सनी गौड याने सांगितल्याप्रमाणे पिंपरी
पुणे या ठिकाणाहुन २२,४८३/- रुपये किंमतीचे, ३० किलो, कार्बाईड इनसर्ट स्क्रॅब मटेरियल जप्त करण्यात आले आहे. सदरचा माल देखील चिखली पोलीस स्टेशन गु. रजि. नंबर ६०४/२०२३, भादवी कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे या गुन्हयातील चोरीस गेलेला माल असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.
तसेच तपासात आरोपी सनी गौड याने चिखली पोलीस स्टेशन गु.रजि. नंबर ६७६/२०२३, भादवी कलम ३९४, ४५४, ४५७, ३८० हाही गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्या गुन्हयातील रु.३७,५००/- रुपये किंमतीचा, ५० किलो, कार्बाईड इनसर्टचा माल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे वरील आरोपींना अटक करून चिखली पोलीस स्टेशन गु.रजि. नंबर ६७६/२०२३, भादवी कलम
३९४,४५४,४५७,३८० वगैरे व चिखली पोलीस स्टेशन गु.रजि. नंबर ६०४/२०२३, भादवी कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे असे दोन गुन्हे उघडकीस आलेले असुन दोन्ही गुन्हयातील एकुण ३,३५,०३६/- रुपये किंमतीचा ४४७ किलो कार्बाईड इनसर्ट माल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी श्री. संदीप डोईफोडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-३, पिंपरी चिंचवड, श्री. राजेंद्र गौर, सहा. पोलीस आयुक्त, भोसरी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. ज्ञानेश्वर काटकर वरीष्ठ पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस स्टेशन यांचे अधिपत्याखाली सपोनि / श्री. तौफिक सय्यद, पोउपनिरी/श्री.अमरदीप पुजारी, पोहवा/गर्जे, पोहवा / सावंत, पोहवा / नांगरे, पोहवा/तारळकर, पोहवा/साकोरे,
पोहवा / नानेकर, पोहवा / शिंदे, पोहवा / मासाळ, पोहवा / मोहिते, पोना / कांबळे पोना/राठोड, पोना/पिंजारी, पोशि/ सकपाळ,
पोशि/भोर, पोशि/ नाईक यांनी यशस्वी रित्या पार पाडली.



