आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

इद ए मिलादच्या पवित्र दिवशी दिव्यांग रुग्ण सिकंदरभाई पठाण यांना मधु ताराच्या माध्यमातून मोफत वॉकर भेट

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०६ सप्टेंबर २०२५ रोजी प्लंबिंग काम करत असताना ३० फुटांवरून खाली पडून जखमी झालेले सिकंदरभाई पठाण यांना मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष नितीनजी शिंदे आणि मधु तारा पिंपरी चिंचवड प्रमुख हसनभाई मुलाणी यांनी पिंपरी येथील डी. वाय. पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल मध्ये मणक्यावर उपचार घेत असलेले सिकंदरभाई पठाण यांना मोफत वॉकर भेट दिली.
या आधीही दोन महिन्या पूर्वी मधु ताराच्या सहकार्यातून सिकंदरभाई यांना व्हीलचेअरचे तसेच साधू वासवानी मिशन यांच्या माध्यमातून केलीपरचे सहकार्य मधु तारा यांच्या वतीने करण्यात आले होते.
या वेळी सिकंदरभाई आणि त्यांच्या मातोश्रींनी मधु ताराचे आभार मानत अनेक आशीर्वाद दिले.
त्याच हॉस्पिटल वॉर्ड मध्ये उपचार घेत असलेले अनेक दिव्यांग रुग्णांनी मधु तारा सोबत चर्चा करून मदतीची अपेक्षा व्यक्त केली.
मधु तारा पिंपरी चिंचवड प्रमुख हसनभाई मुलाणी यांनी त्यांचे उपचार तसेच मदत करण्याचे आश्वासन दिले.
“देव तारी त्याला कोण मारी मधु तारा प्रत्येक दिव्यांगांच्या दारी” राज्यभर दिव्यांगाना पेन्शन त्यांना रोजगार आधार देण्याचे कार्य मधु तारा करते. आपण सर्व दिव्यांगांनी मधु तारा सोबत राहून आपले जीवन सक्षम करावे असे मधु तारा प्रमुख नितीनजी शिंदे यानी यावेळी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!