उत्सवमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

श्री गुरुगणेश विद्यामंदिर माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘९८ वा संस्था वर्धापन दिन ‘ उत्साहात साजरा…

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०९ सप्टेंबर २०२५ श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित श्री गुरुगणेश विद्यामंदिर माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘९८ वा संस्था वर्धापन दिन’ मोठया आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी आदरणीय ॲड. राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा तसेच संस्थेचे सहाय्यक सेक्रेटरी आदरणीय श्री. अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात पवित्र अशा ‘नवकार महामंत्र’ व ‘ओम नमःशिवाय’ च्या जापाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. हनुमंत मारकडसर यांनी केले. व आपल्या मनोगतातून सांगितले की, श्री जैन विद्या प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेची स्थापना ८ सप्टेंबर,१९२७ मध्ये झालेली असून शतकपूर्तीकडे वाटचाल करणारी ही पिंपरी – चिंचवड परिसरातील सर्वात जुनी शैक्षणिक संस्था आहे. तसेच केवळ भारतातच नव्हे तर विदेशात सुद्धा या संस्थेतील विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळविला आहे. याप्रसंगी वाणिज्य विभागप्रमुख प्रा. कु. सोनाली गावडे मॅडम संस्थेचा ९८ वर्षांचा यशस्वी व प्रेरणादायी इतिहास विद्यार्थांसमोर मांडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पिंपरी चिंचवड शहरातील सुप्रसिद्ध उदयोजक श्री. नंदकुमार अनारसे व युवा उदयोजक श्री. अतुलकुमार अनारसे उपस्थित होते. यांनी वाणिज्य विभागातील विदयार्थ्यांसाठी विविध क्षेत्रात असलेल्या संधी आणि ए.आय. हा करिअरचा एक उत्तम पर्याय व याकडे विद्यार्थ्यांनी विशेष करिअरची संधी म्हणून पाहण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ. सविता फपाळ मॅडम यांनी केले. तसेच प्रा.श्री. यशवंत जरांगे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी प्रा.श्री. वैभव मोरे सर त्याचप्रमाणे प्रा. सौ.नीलम इस्ते मॅडम आदी मान्यवर विद्यार्थी समवेत उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!