स्वतःच्या मुलीच्या अपहरणाचा बनाव करुन सासुकडे १० लाख रुपयांची खंडणी मागणार्या आरोपीस ०६ तासात अटक.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड ३१/०८/२०२३ वाकड
स्वतःचे मुलीचा अपहरणाचा बनाव करुन सासुकडे १० लाख रुपयांची खंडणी मागणारे आरोपीस ०६ तासात अटक ०२ अपहारीत मुलींची सुटका वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.
दि.३०/०८/२०२३ रोजी ०२.३० वा सुमा. वाकड पोलीस स्टेशनकडील राञगस्त अधिकारी पो.उप.नि. रोहीत दिवटे हे राञगस्त करीत असताना कोकणे चौक येथे काही महीला व पुरुष घाईगडबडीत गोंधळलेल्या अवस्थेत जाताना दिसुन आलेने त्यांना थांबवुन विचारणा केली असता त्यांनी सांगीतले की, त्यांचे घरातील दोन लहान मुली राञी राखी खरेदी करणेकरीता गेल्या होत्या त्या अदयाप पर्यंत परत आलेल्या नाहीत. पो.उप.नि. रोहीत दिवटे यांनी सदर गोष्टीची तात्काळ दखल घेत त्या सर्वाना वाकड पोलीस स्टेशन येथे घेवुन आले. त्यांचेकडुन प्राथमीक माहीती प्राप्त करता असे समजले की, सारीका कैलास ढसाळ वय ३८ वर्षे रा. कौतीक
हॉटेलचे पाठीमागे, रामनगर रहाटणी पुणे या त्यांची आई पुष्पा आल्हाट यांचे सोबत राहणेस असुन त्यांच्या लग्न झालेल्या दोन बहीणी मुलांसोबत रक्षाबंधन निमीत्त रहाटणी येथे आलेल्या होत्या. त्यातील त्यांची बहीण नामे शितल सचिन मोहीते रा. वाघोली पुणे यांची मुलगी वय १५ वर्षे व सारीका कैलास ढसाळ यांची मुलगी वय ०२ वर्षे या राखी खरेदी करणेकरीता दि. २९/०८/२०२३ रोजी रात्री ८.०० वा. घराचे बाहेर गेल्या होत्या. त्या दोघीही त्यावेळेपासुन मिळुन येत नाहीत अशी हकीकत सांगीतलेने पो.उप.नि. रोहीत दिवटे यांनी वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. ८४९ / २०२३ भादविक ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला. मुलींचे वर्णनाबाबत नियंत्रण कक्ष येथे माहीती देवुन ब्रॉडकास्ट करणेत आला.
दाखल गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन मा. श्री. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे सह. पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त परि २ पिंपरी चिंचवड व मा. श्रीमती स्वप्ना गोरे पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांनी वाकड तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शाखा युनिट नं.०४ यांच्या वेगवेगळे टिम तयार करुन लहान मुलींचा शोध घेवून मुलींची सुटका करुन, आरोपींना अटक करणेबाबत सुचना दिल्या.
मा.श्री.काकासाहेब डोळे, मा. श्रीमती स्वप्ना गोरे व मा. श्री. डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड असे स्वतः वाकड पोलीस स्टेशन येथे अपहृत मुली व आरोपी मिळेपर्यंत थांबुन तपास टिमला मार्गदर्शन करीत होते.
तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी फिर्यादी यांचे घरातील सर्व व्यक्तींची चौकशी केली. त्यावेळी अपहारीत मुलगी हीचे वडील सचिन मोहीते हे हजर होते. त्यांनी फिर्यादी प्रमाणेच हकीकत सांगीतली होती व ते सदर घटनेची माहीती त्यांना
प्राप्त झाले नंतर वाघोली येथुन आलेचे त्यांनी सांगीतले. तपास पथकातील अधिकारी, अंमलदार सदर अपहरत मुली ज्या रस्त्याने
बाहेर पडल्या होत्या तेथील सिसीटीव्ही फुटेज पाहणी व स्थानिक नागरीक तसेच दुकानदारांकडे चौकशी करणे सुरु केली.
यादरम्यानचे काळात सचिन मोहीते हे कोणास काहीएक न सांगता ते चालवित असलेली कार सव्र्व्हिसींग साठी सोडणेसाठी जात असलेचे सांगुन कोठेतरी निघुन गेले होते. अपहरत मुलगी हीची आई शितल सचिन मोहीते यांनी सकाळी १०.०० वा. चौकशी करीत असलेल्या पोलीस अधिका-यांना असे सांगीतले की, फिर्यादी सारीका ढसाळ यांचा सुमारे ०३ महीने पुर्वी गहाळ झालेल्या मोबाईल नंबर वरुन त्यांना व त्यांचे पति सचिन मोहीते यांचे मोबाईलवर सकाळी ०७.१५ वा फोन आला असुन त्यावरुन बोलणारे व्यक्तीने ‘तुमच्या मुली सुखरुप पाहीजे असतील तर पोलीसांना काही न सांगता १० लाख रुपये दया नाहीतर तुमच्या मुलींचे बरेवाईट करेन’ अशी धमकी दिलेची माहीती दिलेवरुन शितल मोहीते यांना सदर फोनवर आपले बोलणे झाले अथवा आपले पतिचे बोलणे झाले याबाबत विचारले असता त्यांनी पति सचिन मोहीते याचेच बोलणे झाले आहे असे सांगीतले. यादरम्यान सिसीटीव्ही पाहणी करीत असणा-या टिमला सदरच्या मुली घरातून बाहेर पडुन मुख्य रस्त्यावर येवून कोणत्यातरी कार मध्ये बसुन जाताना दिसल्या व सदरची कार सचिन मोहीते चालवित असणा-या कारचे वर्णनाशी मिळती जुळती होती. त्यामुळे सदर प्रकारात सचिन मोहीते यांना काहीतरी माहीती असुन ते जाणीवपूर्वक कुठेतरी निघुन गेले असल्याचे संशय पोलीसांना आला.
सचिन मोहीते याचे मोबाईल फोनचे लोकेशन द्वारे माहीती घेतली असता तो पुन्हा वाघोली येथे गेलेचे निष्पन्न झालेने तपास पथकातील स.पो.फौ. काळे, स.पो.फौ. इनामदार व पो.हवा. गिरे यांनी तात्काळ वाघोली येथे जावुन सचिन मोहीते यास तांत्रीक तपासाद्वारे ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने सदर दोन्ही मुलींचे अपहरण हे त्यांची सासु पुष्पा चंद्रकात आल्हाट रा. रामनगर रहाटणी पुणे यांना भिती दाखवुन त्यांचे बँकेत असणारे जंगम मालमत्तेतील १० लाख रुपये मिळविण्यासाठी सदरचा अपहरणाचा बनाव केल्याचे सांगीतले. त्यानंतर त्यास दोन्ही मुली कोठे आहेत याबाबत विचारणा केली असता त्याने सांगीतले की, मी मुलींना वाघोली येथे एका ठिकाणी ठेवले असुन त्यांना सकाळी १०.०० वा नंतर वाघोली येथुन निघुन म.न.पा. पुणे येथे येण्यास सांगीतले होते असे सांगीतले. त्यामुळे लागलीच मुली ठेवल्या होत्या त्या ठिकाणी जावुन पाहणी केली असता
मुली मिळुन आल्या नाहीत. त्यानंतर सदर मुली पी.एम.पी.एम.एल. बसने प्रवास करीत मनपा पुणे येथे पोहोचतील या हेतुने सर्व अधिकारी अंमलदार सदर ठिकाणी जावुन थांबले. परंतु प्रवासाला लागणारे वेळेपेक्षा जास्त वेळ झाला तरी मुली म.न.पा. पुणे येथे पोहोचल्या नाहीत. त्यामुळे सदर बाबत चिंता वाढत गेली. मा.वरिष्ठांना सदर बाबत माहीती दिलेवरुन गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड यांचेकडील ०३ पथके पुणे म.न.पा. येथे रवाना करणेत आले. पी.एम.पी.एम.एल. व्यवस्थापन यांचेशी बोलुन चालक वाहक यांचे वॉट्सअप ग्रुप अस्तित्वात असतील तर त्यावर दोन्ही मुलींचे फोटो टाकुन जर त्या प्रवास करताना मिळुन आल्यास ताब्यात घेणेबाबत कळविले.
दुपारी १३.३० वा. सदर मुली पी.एम.पी.एम.एल. बसने म.न.पा. पुणे येथे आलेवर पो.हवा. गवारी, पो.ना.चव्हाण यांनी त्यांना ओळखून सुखरुप ताब्यात घेतले. आरोपी सचिन मोहीते याने सदरचा गुन्हा हा सासु नामे पुष्पा आल्हाट यांचेकडुन १० लाख रुपयांची खंडणी वसुल करणेसाठी केल्याचे निष्पन्न झालेने सदर गुन्हयात भादविक ३६४(अ), ३८५ चा अंतर्भाव करणेत आला आहे. आरोपी सचिन मोहीते यास गुन्हयात अटक करुन त्याचेकडुन गुन्हा करणेसाठी वापरलेला मोबाईल फोन हस्तगत करणेत आला असून गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे सह. पोलीस आयुक्त, मा.श्री. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त, परि- २ पिंपरी चिंचवड मा. श्री. डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक (गुन्हे), स.पो.नि. संतोष पाटील, पो.उप.नि. सचिन चव्हाण, पो.उप.नि. रोहीत दिवटे, स.पो.फी. बाबाजान इनामदार, स.पो.फौ. राजेंद्र काळे, पो.हवा. वंदु गिरे, पो.हवा. संदीप गवारी, पो.हवा. स्वप्निल खेतले, पो.हवा. प्रमोद कदम, पो.हवा. अतिश जाधव, पो.ना. अतिक शेख, पो.ना. विक्रांत चव्हाण, पो.ना. प्रशांत गिलबीले, पो.शि. भास्कर भारती, पो.शि अजय फल्ले, पो.शि रमेश खेडकर, पो.शि. कौंतेय खराडे, पो.शि. सागर पंडीत (परि ०२ कार्यालय) तसेच गुन्हे शाखा युनिट नं. ०४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. शंकर आवताडे, पो.उप.नि. रायकर व अंमलदार यांनी मिळुन केली आहे.



