शहरसामाजिक

मंजूर निधीची माहिती प्रशासकीय अधिकारी यांनीच द्यावी – अँड. नितीन पोळ

प्रतिनिधी अजय विघे-
कोपरगाव तालुक्यातील प्रस्तावित व मंजूर झालेल्या विकास कामाच्या निधीची माहिती प्रशासकीय अधिकारी पानीच द्यावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की राज्य व केंद्र शासन विविध विकास कामा करिता ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार व खासदार यांना निधीची तरतूद करत असते सदरचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत वितरित केला जातो. सदर निधी करीता त्या त्या विभागामार्फत कामाची मागणी केली जाते. तसा प्रस्ताव दिला जाती, त्यानंतर सदर कामाचे प्रस्ताव तयार केले जातात. त्यास प्रशासकीय मंजुरी व त्यानंतर आर्थिक बजेट मंजूर केले जाते ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अनेक कागदी घोडे नाचवले जातात आणि अखेर सदर कामाला प्रत्यक्ष सुरुवात होते सदर कामाचा व निधीचा उपयोग त्या त्या विभागाच्या योजने मधून बसवले जाते मात्र असे असले तरी सद्या तरी कोपरगाव तालुक्यात श्रेप वादाचे राजकारण सुरू असून,आजी माजी लोकप्रतिनिधी आमच्या मुळेच सदर काम मार्गी लागले असे सांगून बॅनर बाजी व एकमेकांवर टिका करताना दिसतात त्याच प्रमाणे मर्जीतील ठेकेदार व वेळप्रसंगी विकास कामाना पेट न्यायालयातून स्थगिती मिळवून सदर विकास कामाची अक्षरशा वाट लावली जाते त्यामुळे जनतेला विकास कामा पेक्षा श्रेय वादाचा कलगीतुरा अनुभवायला मिळतो वास्तविक लोक प्रतिनिधी फक्त कामाचे प्रस्ताव पाठवतात त्यावर अशा प्रस्तावित कामाना जिल्हा नियोजन समिती मजुरी व निधी देते मात्र लोक प्रतिनिधी कडून केली जाणारी दिशाभूल थांबायची असेल तर अशा मंजूर व निधी प्राप्त कामाची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व नगर पालिकेचे मुख्याधिकारी तसेच नियोजन समितीचे प्रमुख या नात्याने जिल्हाधिकारी या प्रशासकीय अधिकारी यांनी प्रसिद्धी माध्यमांना द्यावी अशी मागणी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!