पुसदची बौद्धकन्या कुमारी डॉ. प्रिया शेजुळे यांची इस्रो मध्ये संशोधन शास्त्रज्ञ पदी निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड येथे भव्य नागरी सन्मान सोहळा संपन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १७ सप्टेंबर २०२५ विदर्भ कन्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील अशोक शेजुळे व अनिता शिरोळे यांची सुपुत्री डाॅ. प्रिया शेजुळे यांचा सन्मान पिंपरी चिंचवड येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भीमशाहीर अनिरुद्ध सूर्यवंशी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सुमनताई चोपडे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी अशोक गायसमुद्रे, यांनी अथक परिश्रमातून हा सोहळा घडवून आणला. पिंपरी चिंचवड येथील सर्व कलावंतांच्या वतीने प्रिया शेजुळे यांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. प्रिया शेजुळे यांनी स्वतःच्या कष्ट चिकाटी जिद्द आणि शैक्षणिक प्राविण्याच्या जोरावर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे त्यांचा संघर्षमय जीवन प्रवास आज लाखो तरुण स्वप्नवंतांना आशेचा किरण आणि प्रेरणेचा स्रोत ठरत आहे डॉ. प्रिया शेजुळे यांचे वडील अशोक किसन शेजुळे हे तलाठी म्हणून शासकीय सेवेत कार्यरत आहे आणि त्यांची आई अनिता ही गृहणी आहे अल्पसाधनांच्या वातावरणात वाढलेल्या प्रियाला लहानपणापासूनच आई-वडिलांनी शिस्त शिक्षण व कठोर मेहनतीची मूल्य दिली प्रियाचे शालेय शिक्षण पुसद येथील महात्मा मुंगसाजी विद्यालय पूर्व प्राथमिक आणि नंतर राणी लक्ष्मीबाई विद्यालयात झाले अभ्यासातील प्राविण्यामुळे के. डी. हायस्कूल पुसद मध्ये एसएससी परीक्षेतील गुणवंत यादीत स्थान मिळवले त्यानंतर पी. एन. कॉलेज पुसद येथे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करून तिला देशातील नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालय सीओईपी पुणे येथे प्रवेश मिळाला तिने एनआयटी राऊलकेला ओडिशा येथे एमटेक आणि नंतर आयआयटी गुवाहाटी येथे पीएचडी केली राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पा अंतर्गत “पूर व्यवस्थापन आणि सुधारित पर्जन्यमान अंदाज” या विषयावर केलेल्या उत्कृष्ट संशोधनासाठी तिला पंतप्रधान संशोधन फेलोशिप मिळाली या काळातच तिने आपल्या संशोधनाची मांडणी करण्यासाठी जगभरातील अनेक शैक्षणिक परिषदांमध्ये अमेरिका दक्षिण कोरिया आणि युरोप येथे सहभाग घेतला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले. तिच्या यशाची ही आनंद वार्ता संपूर्ण भारतीयांना अभिमानाची बाब ठरली आहे. त्यानिमित्ताने आंबेडकरी चळवळीतील सुप्रसिद्ध भीम शाहीर अनिरुद्ध सूर्यवंशी, सुप्रसिद्ध गायिका सुमन चोपडे, तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी अशोक गायसमुद्रे यांच्या संकल्पनेतून डॉ. प्रिया शेजुळे यांचा धम्मचक्र बुद्ध विहार शाहूनगर चिंचवड येथे भव्य दिव्य असा सन्मान सोहळा काल रविवारी पार पडला. या सोहळ्यामध्ये अनेक दिग्गज गायकांनी डॉ. प्रिया अशोक शेजुळे यांना गायन रुपी शुभेच्छांचा वर्षाव केला. यामध्ये प्रामुख्याने सुप्रसिद्ध गायक पुण्याचा राघू राहुल शिंदे. सुप्रसिद्ध गायक कमलेश शेजुळे, विजय कावळे, भगवान शिरसाट, सतीश प्रघणे, कवी गोविंद दादा गाडे, किशोर रणवीर, कैलास शिंदे, सुमेध कल्हाळीकर, प्रतीक सूर्यवंशी, जयराम लांडगे संदिपान इंगळे, बी. डी. मोरे मोहन धीवार, सुधाकर गरड, संजय कांबळे, अमित तायडे, भारत बाबू, तसेच अनेक सुप्रसिद्ध गायिका मयुरी सूर्यवंशी, स्वरेषा उजगरे समृद्धी उजगरे, सुरेखा कुलाळ, मनीषा धीवार, मनीषा सपकाळे, सुजाता पुणेकर, शिलाबाई साबळे इत्यादी नामवंत गायक नायिकांनी गाणी गायली. या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, सुरेश कसबे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त, बी. बी. गायसमुद्रे महाराष्ट्र राज्य समाजभूषण पुरस्कार प्राप्त, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते राजन नायर, संतोष जोगदंड, विशाल कांबळे पॅंथर युवा मोर्चाच्या महिला आघाडी अध्यक्ष कमल गायकवाड, व त्यांचे सहकारी, पत्रकार सुनील गायकवाड तसेच पिंपरी चिंचवड शहरातील अनेक मान्यवर व संविधान प्रेमी नागरिक व अनेक धार्मिक शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. वर्षावास सूरू असल्याने या कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमशाहीर अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी वर्षावास निमित्त गीत गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. डॉ. प्रिया शेजुळे यांनी उपस्थितांना मोलाची शैक्षणिक व त्यांच्या कार्या बद्दल मोलाची माहिती सांगितली शेवटी सुप्रसिद्ध गायक पुण्याचा राघू राहुल शिंदे यांनी गीत गायनातून प्रेक्षकांना उत्साहित केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, सतीश प्रघणे व प्राध्यापक युवराज तिकटे यांनी केले.



