महाराष्ट्रशहरसामाजिक

शुन्य कचरा झोपडपट्टी या पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या प्रकल्पात महिला बचत गटांना दिलेली संधी

प्रतिनिधी-दि.२७/०४/२०२३ शुन्य कचरा झोपडपट्टी या पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या प्रकल्पात महिला बचत गटांना दिलेली संधी महिला विकासा साठी महत्वाची असल्याचे मत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड (IAS) यांनी मत व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवी दिशा योजनेअंतर्गत शून्य कचरा झोपडपट्टी प्रकल्प, गवळीमाथा, भोसरी- या ठिकाणी मा.डॉ. इंदू जाखड (IAS) व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी भेट दिली त्यावेळी त्या बोलत होत्या.अर्चना क्षीरसागर, वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी, माविम, पुणे. वंदना कवटे, सहाय्यक जिल्हा समन्वयक अधिकारी, माविम, पुणे त्यांचे समवेत श्रीम. अश्विनी संगेकर, प्रकल्प सल्लागार, कनक खरे प्रकल्प सल्लागार व श्री गौरव काळे समाजिक व वित्तीय सल्लागार,माविम पुणे, यांनी दिनांक २७/०४/२०२३ रोजी दु. २ वाजता प्रकल्पास भेट दिली.
सदरचा प्रकल्पाचे व्यवस्थापन करणा-या महिला बचत गटाकडून प्रकल्पाच्या अनुषंगाने ओला /सुका कचरा अलगीकरण व खतनिर्मिती बाबतची माहिती मा. डॉ. इंदू जाखड यांनी घेतली. प्रभाग क्र ८ मधील गवळीमाथा येथील दैनंदिन निर्माण होणा-या ओल्या कच-यापासून तयार झालेले खत महानगरपालिकेच्या उद्यानांत वापरले जात पर्यायाने महानगपालिकेस खत खरेदीकरिता येणा-या खर्चात बचत होत आहे. याबाबतची माहिती क्षेत्रीय अधिकारी तथा सहा. आयुक्त श्री अण्णा बोदडे यांनी दिली व त्यांचे स्वागत केले श्री. बोदडे यांनी गवळी माथा झोपडपट्टी, शुन्य कचरा प्रकल्पाची व शुन्यकचरा कार्यालय उपक्रम याची माहिती दिली. या प्रकल्पांची यशस्वी गाथा त्यांनी यावेळी महिला बचत गटाच्या महिलां कडून जाणून घेतली. तसेच त्यांचे या अभिनव उपक्रमाबाबत अभिनंदन केले.
सहा. आरोग्याधिकारी श्री. तानाजी दाते, आरोग्य निरिक्षक श्री. क्षितिज रोकडे, श्री. राजेंन्द्र उज्जिनवाल, श्री. संजय मानमोडे तसेच श्रीकृष्ण महिला बचत गटातील, सौ. मंगल वाडकर, सौ. संगिता बदाले व इतर महिला सदस्यांकडून मा. डॉ. इंदू जाखड (IAS) यांचा शाल व पुस्तक देऊन सन्मान करणेत आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!